UP-गोव्याच्या मोहिमेवरील सेनेला महाराष्ट्रात धक्का; नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Shivsena : शिवसैनिकांचे सामूहिक राजीनाम्याचे हत्यार
Shivsena - Uddhav Thackeray
Shivsena - Uddhav ThackeraySarkarnama

अलिबाग : राज्यात सत्तेत असलेली शिवसेना (Shivsena) आता देशात पक्षविस्ताराचे धोरण आग्रहाने राबवत आहे. त्यामुळेच सध्या सुरु असलेल्या उत्तर-प्रदेश (Uttar Pradesh Assembly election) आणि गोवा निवडणुकीत (Goa Assembly election) शिवसेना आक्रमकपणे उतरली आहे. मात्र असे असतानाच शिवसेनेला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. राज्यात शिवसेनेतील नाराजी पुन्हा एकदा पुढे आली आहे. एका बाजूला शिवसेनेच्या नेत्यांनी वार्‍यावर सोडल्याची भावना आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून होणारी कोंडी यामुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांनी आज सामूहिक राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे.

रायगड जिल्ह्यातील (Raigad District) श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन जिल्हा परिषद गटातील नाराज आणि हतबल शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जमलेल्या शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांनी आपली खदखद व्यक्त केली. सत्ता असूनही विकास कामे होणार नसतील तर जनतेला सामोरे कसे जाणार? असा सवाल करत यावेळी पदाधिकार्‍यांनी आणि शिवसैनिकांनी वैतागून सामूहिक राजीनामे दिले आहेत. यात उपजिल्हाप्रमुख श्यामकांत भोकरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Shivsena - Uddhav Thackeray
कोल्हेंनी शिवाजीराजेंची भूमिका का केली असे कधी विचारले का? : नाना पाटेकर

यावेळी बोलताना राजीनामा दिलेले श्रीवर्धन उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर म्हणाले, जिल्हा नियोजन मंडळामार्फत शिवसेनेच्या वाट्याला दरवर्षी निधी येतो. पण ५ वर्षात काहीच निधी न दिल्याने मी रायगडमधील तिन्ही आमदार, मंत्री सुभाष देसाई, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांचीही भेट घेतली; मात्र काही उपयोग झाला नाही. शेवटी जिल्हा नियोजन मंडळाचा निधी शिवसेनेचेच तीन आमदार पळवणार असतील तर निवडणुकीत मतदारांना आम्ही तोंड कसे दाखवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Shivsena - Uddhav Thackeray
"मला सोड अन्यथा... अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत" ; आमदार मुंदडांच्या पतीला धमकी

तोंडलेकर पुढे म्हणाले, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे तिन्ही आमदार श्रीवर्धनमध्ये लक्ष देत नाहीत. विकासकामे करायला गेलो तर मला दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा करुनही कोणताही निधी मिळत नाही. आम्ही बोर्लीपंचतन जिल्हा परिषदेचा गड पहिल्यांदाच जिंकला; परंतु पक्षाने उचलून धरले नाही. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघच मोडायला काढला असल्याचे दिसत आहे. तशी इच्छाच जर रायगडाच्या नेत्यांची असेल तर आपल्याच्याने हे पहावणार नाही, असे म्हणत त्यांनी उपतालुका प्रमुखपदाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in