Maharashtra News : शिंदे सरकारचा अजब कारभार; नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच ३६ तहसिलदारांच्या बदल्या

Tahsildar Transfers : सभागृहात विरोधक शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची शक्यता...
Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Devendra Fadnavis | Eknath Shinde|sarkarnama

Shinde-Fadnavis Government News : राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. याचे तीव्र पडसाद अधिवेशनात देखील उमटलेले पाहायला मिळत आहेत. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी देखील पाहायला मिळाली होती. एकीकडे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसामुळं झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विधानसभेच्या सभागृहात दिली होती. तसेच अवकाळी पावसामुळं गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्रा या पिकांचं नुकसान झाले असून, तत्काळ नकसानग्रस्त भागाची माहिती शासनानं मागितली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची भूमिकाही फडणवीसांनी मांडली होती.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
OBC : ओबीसींसाठी दहा लाख घरे बांधून देण्याच्या घोषणेचे ओबीसी नेत्यांकडून स्वागत !

या धर्तीवर राज्य सरकारच्या वतीनं नुकसानीचे युध्दपातळीवर पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. काही ठिकाणी पंचनामे सुरुही आहेत. मात्र, याचदरम्यान राज्यातील 36 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक होत शिंदे फडणवीस सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

या तहसीलदारांच्या बदल्या :

कविता जाधव (तहसिलदार,रोहा), श्वेता पवार(अपर तहसिलदार,कल्याण),भाऊसाहेब अंधारे( तहसिलदार,उरण), प्रवीण लोकरे(तहसिलदार, वेंगुर्ला), विकास गारुडकर(अपर तहसिलदार ,माणगाव), प्रियंका कांबळे- अहिरे(तहसिलदार, माणगाव),माधवराव बोथीकर (तहसिलदार, उमरी,नांदेड), पल्लवी टेमकर(तहसिलदार,पूर्णा,परभणी), गोविंद येरमे(तहसिलदार, गंगाखेड), रमेश कुंभरे,(तहसिलदार साकोली, भंडारा), संतोष महाले (तहसिलदार, देसाईंगंज), उमेश पाटील (तहसिलदार, अहमदनगर) यांचा समावेश आहे.

Devendra Fadnavis | Eknath Shinde|
Maharashtra Budget : महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट देण्याची घोषणा ही दिल्ली मॉडेलची कॉपी; 'आप'ची टीका

तसेच प्रियदर्शिनी बोरकर(तहसिलदार,नागपूर), सखाराम मांडवगडे (तहसिलदार, जिंतूर),विक्रम पाटील(करमणूक कर अधिकारी,मुंबई उपनगर), कपिल हाटकर (तहसिलदार,मुलधेरा, गडचिरोली),राजू रणवीर (तहसिलदार,समुद्रपुर,वर्धा), रोशन मकवाने (तहसिलदार,वरोरा,चंद्रपूर),संतोष खांडरे(तहसिलदारगोंदिया),किशोर देशमुख(तहसिलदार),नीलिमा सूर्यवंशी(तहसिलदार,शहापूर),संदीप पुंडेकर(अपर तहसिलदार बेला, नागपूर) या तहसीलदारांचा समावेश आहे.

राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याची मुख्य जबाबदारी तहसीलदार आणि इतर प्रशासन यंत्रणावरती आहे. अशातच 36 तहसीलदारांच्या बदल्या केल्या आहेत. अचानक बदल्या केल्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधक शिंदे फडणवीस सरकारला लक्ष करणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com