राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ३३ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

IPS officers transfer | Krishna Prakash | Deepak Pandey : वादग्रस्त पांडेची अन् धडाकेबाज कृष्णप्रकाश यांचीही बदली
राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ३३ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
Krishna Prakash | Deepak Pandey Sarkarnama

मुंबई : राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट करण्यात आली असून एकाच वेळी तब्बल ३३ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात नाशिकचे वादग्रस्त पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांचाही समावेश आहे. पांडे यांची नाशिकच्या पोलिस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आली असून त्यांना आता मुंबईत महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर पाठवण्यात आले आहे. तर मुंबईतील व्हीआयपी सुरक्षा विभागातील उप महानिरीक्षक जयंत नाईकनवरे (jayant Naiknaware) हे आता नाशिकचे नवे पोलिस आयुक्त (Nashik city Commissioner) असणार आहेत.

याशिवाय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त (Pimpri Chinchwad City Commissioner) कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash Transfer) यांचीही पदोन्नतीने बदली झाली असून त्यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षक, व्हीआयपी सुरक्षा पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. तर पिंपरी चिंचवडचे नवे आयुक्त म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक, सुधार सेवा मुंबई पदावर कार्यरत असलेल्या अंकुश शिंदे यांना आणण्यात आले आहे. पुण्याचे सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे यांचीही बदली झाली असून त्यांच्याकडे आता राज्य मानवी हक्क आयोगातील विशेष पोलिस महानिरीक्षक ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी बृहन्मुंबईच्या पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांना आणण्यात आले आहे. यातून पोलिस उपमहानिरीक्षक वरुन विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची नावं आणि पदस्थापना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.