महाराष्ट्रातून आठ महिलांनी गाठली लोकसभा 

लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आठ महिला खासदार निवडून आल्या आहेत.निवडून आलेल्या महिला खासदारांमध्ये भाजपच्या पाच, शिवसेना एक, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक आणि अपक्ष एक आहेत.
महाराष्ट्रातून आठ महिलांनी गाठली लोकसभा 

पुणे - लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून आठ महिला खासदार निवडून आल्या असून, हे प्रमाण 16.66 टक्के आहे. त्यामुळे महिला खासदारांचे प्रमाण वाढण्यासाठी सर्वच पक्षांना कसून मेहनत करावी लागणार आहे. निवडून आलेल्या महिला खासदारांमध्ये भाजपच्या पाच, शिवसेना एक, राष्ट्रवादी कॉंग्रेस एक आणि अपक्ष एक आहेत. 

महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या महिला खासदार अशा - 

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस) - बारामती - सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या. त्यांनी सलग तिसरा विजय मिळवला आहे. १,५५,७७४ मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे. 

भावना गवळी (शिवसेना) - यवतमाळ-वाशीम - भावना गवळी यांनी काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांना 17, 939 मतांनी मात करून पराभूत केले आहे.  

प्रीतम मुंडे (भाजप) - बीड - प्रीतम मुंडे या भाजपच्या दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्या बीडमधून लोकसभेच्या रिंगणात होत्या. त्या १,६८,३६८ मतांनी त्या विजयी झाल्या आहेत. 

रक्षा खडसे (भाजप) - रावेर - खडसे यांनी 3,35,882 मतांच्या प्रचंड फरकाने आपली जागा राखली. रक्षा खडसे यांनी काँग्रेसच्या उल्हास वासुदेव पाटील यांना ३,३५,८८२ एवढ्या मोठ्यां फरकांनी पराभवाची धूळ चारली. एकनाथ खडसे यांच्या त्या सुनबाई आहेत. 

डॉ. हीना गावित (भाजप) - नंदुरबार - डॉ. हीना गावित या नंदुरबार मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी काँग्रेसच्या अॅड. के. सी. पडवी यांना ९५६२९ मतांनी हरवलं आहे .   

पूनम महाजन (भाजप) - मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त याना १,३०,००५ एवढ्या मतांनी पराभूत केले आहे. प्रिया दत्त या काँग्रेस नेते सुनील दत्त यांची मुलगी आहे.  

डॉ. भारती पवार (भाजप) - दिंडोरी - भारती पवार यांनी  राष्ट्रवादी
काँग्रेसच्या धनराज हरिभाऊ महाले यांना 198779 मतांनी पराभूत केले आहे. 

नवनीत राणा (अपक्ष) - (अमरावती) - अपक्ष आमदार रवी राणा
यांच्या पत्नी नवनीत राणा पहिल्यांदाच विजयी झाल्या आहेत.
अमरावतीमध्ये 36,951 मतांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com