...पण 'महाराष्ट्र विकास आघाडी' हे नाव वापरता येणार कां?

अण्णाराव पाटील हे पेशाने वकील आहेत. ते बार कौन्सिलचे सदस्यही आहेत. त्यामुळे ते या नावाचा वापर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला करू देतात का, हे पहावे लागणार आहे.
...पण 'महाराष्ट्र विकास आघाडी' हे नाव वापरता येणार कां?

पुणे: शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 'महाराष्ट्र विकास आघाडी' स्थापन केली असली तरी त्यांना हे नाव वापरता येईल का, हा प्रश्न आहे. कारण या नावाने निवडणूक आयोगाकडे एक पक्ष नोंदणीकृत आहे. 

गेले काही दिवस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्रित येवून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तिन्ही पक्षांमध्ये संयुक्त कार्यक्रमाबरोबरच सत्तावाटपाच्या सुत्रावर चर्चा सुरू होती, तोपर्यतच अजित पवार भाजपला मिळाल्याने चार दिवस भाजपचे सरकार सत्तेवर आले होते. दरम्यानच्या काळात हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. आज न्यायालयाने निकाल दिल्यानंतर समीकरणे बदलली. या निकालानंतर थोडयाच वेळात अजित पवार यांनी मग देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.

फडणवीस सरकार कोसळल्यानंतर रात्री शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेसाठी 'महाराष्ट्र विकास आघाडी'ची स्थापना करण्यात आली, तसेच आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांची घोषणा झाली. त्यानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने स्थापन केलेल्या आघाडीचे नाव हे अगोदरच एका राजकीय पक्षाने घेतलेले आहे. लातूर येथील अण्णाराव पाटील यांनी स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'ने यापुर्वी निवडणुका लढवल्या आहेत. आताच्या निवडणुकीत ते वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डात होते. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा 'महाराष्ट्र विकास आघाडी' या नावाने आपले स्वतंत्र काम सुरू केले आहे. 

अण्णाराव पाटील हे पेशाने वकील आहेत. ते बार कौन्सिलचे सदस्यही आहेत. त्यामुळे ते या नावाचा वापर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसला करू देतात का, हे पहावे लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com