राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे?

कालपासून मुंबई आणि दिल्लीत महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी ज्या हालचाली होत आहेत त्या पाहता सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे नाहीत. एका बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये आज होणारी चर्चा लांबली आहे. तर दुसरीकडे केवळ चोवीस तासांत आमदारांची जमवाजमव करणे अवघड असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
Maharashtra Heading Towards Presidents Rule
Maharashtra Heading Towards Presidents Rule

मुंबई : कालपासून मुंबई आणि दिल्लीत महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी ज्या हालचाली होत आहेत त्या पाहता सत्तास्थापनेचा तिढा लवकर सुटण्याची चिन्हे नाहीत. एका बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये आज होणारी चर्चा लांबली आहे. तर दुसरीकडे केवळ चोवीस तासांत आमदारांची जमवाजमव करणे अवघड असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्रे काल दिली नाहीत. त्यामुळे शिवसेनेची सत्ता स्थापनेची संधी हुकली. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले आहे. आताची स्थिती लक्षात घेतला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय १४५ चा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीला सत्तेवर दावा सांगण्यासाठी केवळ काही तासांचा वेळ हाती असताना पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चेसाठी दोन दिवसांची वेळ मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आज काँग्रेसचे अहमद पटेल व मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी येणार होते. मात्र, शरद पवार यांनी फोन करुन अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना दोन दिवसांनी येण्यास सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

दुसरीकडे काँग्रेसचेही बैठकांचे सत्र संपलेले नाही. दिल्लीत काँग्रसच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. तर के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार हे काँग्रेस नेते पुन्हा एकदा आपल्या आमदारांशी चर्चा करण्यासाठी जयपूरला गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसही वेळकाढूपणा करत आहे, अशी राजकीय गोटात चर्चा आहे.

दुसरीकडे आपल्या ५४ आमदारांची जमवाजमव करणे थोड्या कालावधीत अवघड असल्याचे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, ''चोवीस तासात नाव, मतदारसंघ क्रमांक आणि त्यांची सही घेण्यास राज्यपालांनी आम्हाला सांगितले आहे. ५४ आमदारांच्या सह्या आम्हाला घ्यायच्या आहेत. इतक्या कमी वेळात हे होणे अवघड आहे. काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा असेल तर काँग्रेसलाही हे करावे लागेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापता येणार नाही,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com