चंद्रकांतदादांचेही गांडो थयो छे! सामनाच्या रडारवर आता चंद्रकांत पाटील

'विकास वेडा झाला आहे', असे सांगत प्रधानमंत्री मोदींवर निशाणा साधल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या रडारवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आले आहेत. 'चंद्रकांतदादांचेही गांडो थयो छे!' या मथळ्याखाली सामनात लिहिलेल्या अग्रलेखात चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आले आहेत.
चंद्रकांतदादांचेही गांडो थयो छे! सामनाच्या रडारवर आता चंद्रकांत पाटील

मुंबई : 'विकास वेडा झाला आहे', असे सांगत प्रधानमंत्री मोदींवर निशाणा साधल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या रडारवर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आले आहेत. 'चंद्रकांतदादांचेही गांडो थयो छे!' या मथळ्याखाली सामनात लिहिलेल्या अग्रलेखात चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे लिहतात, ''शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतले आहे असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील हे तसे बरे गृहस्थ आहेत व त्यांचे अमित शहा यांच्याशी बरे संबंध असल्यामुळेच ते आज महसूलमंत्री पदावर आहेत. तसेच भावी मुख्यमंत्री म्हणूनदेखील ते सदैव शर्यतीत आहेत. आम्ही त्यांच्या भावी राजकीय कारकीर्दीस शुभेच्छा देत आहोत,'' मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा बाळगणाऱ्या एकनाथ खडसे यांची सध्या काय अवस्था झाली आहे याचा अभ्यासही चंद्रकांतदादांनी करायला हवा अशी सूचना एक हितचिंतक म्हणून आम्ही करत असल्याचे सांगत ठाकरे यांनी पाटील यांना चिमटा काढला आहे.

ते पुढे म्हणतात, ''सत्तेच्या जहाल 'खोपडी' दारूने राज्यकर्त्यांच्या डोक्याची हातभट्टी झाल्यानेच त्यांना महागाई विरोधात आंदोलन करणारे मूर्ख, हास्यास्पद वाटत असावेत. 'अच्छे दिन येणार, ते पहा आलेच आहेत', असे सांगून सत्तेत आल्यावरही ते 'अच्छे दिन' काही आलेच नाहीत. त्यामुळे मोदी सरकारचे घरोघरी हसू झाले आहे असे आम्ही बोललो तर पाटील यांची कळी खुलेल काय? असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला आहे.

अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, कर्जमाफीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. ठाकरे म्हणतात, ''पुन्हा शेतकरी कर्जमाफीचीही तशी अजून बोंबच आहे. ऑनलाइन अर्ज भरणे वगैरे ठीक असले तरी कर्जमाफीसाठी सरकारी अटींची पूर्तता करता करता कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. किंबहुना कर्जमाफी नको, पण अटी व शर्ती आवरा, अशी सध्या बळीराजाची अवस्था झाली आहे. कर्जमाफी म्हणजे अद्यापि जणू 'नाटक'च ठरले आहे आणि ते संपलेले नाही.'' या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घेणार आहात की नाही? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी असल्याची जाणिवही ठाकरे करून देतात. मात्र, ती पार पाडण्यास राज्यकर्ते नालायक ठरल्यामुळेच शिवसेनेला रस्त्यावर उतरावे लागले असल्याचेहा ठाकरे स्पष्ट करतात. उद्धव ठाकरे म्हणतात, ''जनतेचे आशिर्वाद आम्हांस आहेत, पण सरकारला ते पटत नसेल तर त्यांच्या डोक्याचा 'गांडो थयो छे!' बरोबर ना, चंद्रकांतदादा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com