Maharashtra Politics Narayan Rane has been given target ? | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने पक्ष  प्रवेशासाठी नारायण राणे यांना दिले आमदार फोडण्याचे 'टार्गेट ' !

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई   : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समवेत किती आमदार येणार याचा अंदाज घेण्याचे निर्देश , भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिल्याचे समजते . 

मुंबई   : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समवेत किती आमदार येणार याचा अंदाज घेण्याचे निर्देश , भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिल्याचे समजते . 

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही आपला भाजपमधील प्रवेश सन्मानपूर्वक आणि आपल्या नावलौकिकाला साजेसा व्हावा यासाठी सर्व शक्ती पणाला लावली असल्याचे समजते . आधी शिवसेनेत असताना त्यांनी  महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते . त्यानंतर काँग्रेसमध्ये काम करताना त्यांच्या जनसंपर्काचे वर्तुळ रुंदावले होते . 

त्यामुळे आपले सर्व बळ एकवटून  आपल्याबरोबर जास्तीत जास्त वजनदार कार्यकर्ते  यावेत यासाठी राणे प्रयत्नशील आहेत .  मात्र शिवसेनेतून काँग्रेस मध्ये जाताना त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांची काँग्रेस मधील विलासराव देशमुख गटाने शिवसेनेशी हात मिळवणी करून मोठीच अडचण केली होती . त्याची पुनरावृत्ती यावेळी होऊ नये याची काळजी राणेंना घ्यावी लागेल . 

आमदार नीतेश राणे यांनी आज कोळंबकर यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली.त्यानंतर लगेचच कोळंबकर यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास तर व्यक्‍त केलाच पण पाठोपाठ नारायण राणे हे आपले मित्र आहेत,ते म्हणतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेवू असेही कोळमकर यांनी स्पष्ट केले आहे.

नितेश राणे आणि कोळंबकरांच्या  मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली तर भाजप यशस्वी होईल काय हे तपासून पाहिले जाणार आहे.नारायण राणे यांना पक्षात प्रवेश देण्यास भाजपची तयारी असली तरी मुहुर्त कोणता याचा निर्णय अदयाप झालेला नाही.अमित शहा यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

नारायण राणे यांना भाजप मध्ये विनाअट प्रवेश नाही हे यानिमित्ताने स्पष्ट होते .  नारायण राणे आपल्या  बरोबर   काँग्रेस आणि इतर पक्षातून काही  आमदार घेऊन येतात का  यावर त्यांचे भाजप मधील  महत्व ठरणार असल्याचे समजते

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख