Maharashtra politics congress Ashok Chavan | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसअंर्तगत सर्व सेलच्या कार्यकारिणी बरखास्त

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 जुलै 2017

आता काँग्रेस पक्षाशी संलग्न असणार्‍या बाराही सेलच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीची सर्व पदे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाद्वारे  रिक्त झाली आहेत. लवकरच या रिक्त पदांवर योग्य कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. तसेच लवकरच आणखी काही सेल बरखास्त करण्यात येणार असून त्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये संघटनात्मक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच राज्यावर मध्यावधी निवडणूकीची टांगती तलवार असल्यामुळे संघटनात्मक बळकटीसाठी नव्याने काँग्रेसची संघटना बांधणी करण्यात येत आहे.  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणारे खालील सेल बरखास्त करण्यात आले आहेत.

आता काँग्रेस पक्षाशी संलग्न असणार्‍या बाराही सेलच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीची सर्व पदे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशाद्वारे  रिक्त झाली आहेत. लवकरच या रिक्त पदांवर योग्य कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. तसेच लवकरच आणखी काही सेल बरखास्त करण्यात येणार असून त्यांचीही पुनर्रचना करण्यात येणार असल्याची माहिती माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

नागरी विकास, निराधार व निराश्रीत व्यक्ती विकास, असंघटीत कामगार सेल, भटक्या जाती व विमुक्त जमाती, सफाई कामगार सेल, सामाजिक न्याय विभाग, उच्च तंत्रशिक्षण सेल, शिक्षक सेल, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सांस्कृतीक विकास सेल, रोजगार व स्वयंरोजगार सेल, कच्छी गुजरात सेल या सेलची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख