Maharashtra Political Yatra's Will Resume from Next Week | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

पूरस्थिती सुधारल्याने राजकीय यात्रा पुन्हा सुरु होणार

उत्तम कुटे
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी या तीन प्रमुख राजकीय पक्षांनी राज्यभर यात्रा काढल्या. मात्र सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे त्या पहिल्या टप्यातच थांबविण्यात आल्या होत्या. मात्र,पूरस्थिती सुधारल्याने आता त्या पुन्हा सुरु होत आहेत. तर, महाजनादेश यात्रेला उत्तर म्हणून कॉंग्रेसही आता आपली यात्रा सुरु करणार आहे. 

पिंपरी : पूरस्थिती साधारण झाल्याने स्थगित करण्यात आलेल्या राजकीय यात्रा पुन्हा सुरू होत आहे. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा येत्या सोमवारपासून (ता.१९),तर भाजपची महाजनादेश यात्रा मंगळवारपासून (ता.२१) सुरु होत आहे. शिवस्वराज्यचे सारथ्य खासदार डॉ.अमोल कोल्हे, तर महाजनादेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या निवासाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ भाजपचे गटनेते तथा पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी या तीन प्रमुख राजकीय पक्षांनी राज्यभर यात्रा काढल्या. मात्र सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे त्या पहिल्या टप्यातच थांबविण्यात आल्या होत्या. मात्र,पूरस्थिती सुधारल्याने आता त्या पुन्हा सुरु होत आहेत. तर, महाजनादेश यात्रेला उत्तर म्हणून कॉंग्रेसही आता आपली यात्रा सुरु करणार आहे. 

राष्ट्रवादीची दुसऱ्या टप्यातील यात्रेचा कालावधी  १९ ते २६ ऑगस्ट आहे. पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ती सुरु होत आहे.  नाशिक जिल्हयात बागलाण येथे ती स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुरग्रस्तांच्या मदतीस उतरली आहे. अजुनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. तर,भाजपची यात्रा नंदूरबारपासून सुरु होत आहे. शहादा, सारंगखेडा,दोंडाईचा ,सिंदखेडराजा, धुळे, धरणगाव, जळगाव, जामनेर, भुसावळ असा तिचा दोन दिवसाचा प्रवास आहे.

महाजनादेश यात्रा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख