आमदार संगीता ठोंबरेंच्या प्रवासाला पती विजयप्रकाशरावांनी दिले बळ

एखाद्या कतृत्ववान पुरुषांच्या यशात त्याची आई आणि अर्धांगीनीचा वाटा असतो असे नेहमी ऐकण्यात येते. पण, प्रा. संगीता ठोंबरे यांचे शिक्षण पुर्ण करुन शिक्षकी पेशापर्यंत नेत पुढे आमदारांच्या खुर्चीवर बसवण्यात त्यांचे पती प्रा. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांचे मोलाचे पाठबळ राहीले आहे.
आमदार संगीता ठोंबरेंच्या प्रवासाला पती विजयप्रकाशरावांनी दिले बळ

प्राध्यापिका ते आमदार; आता सहकार आणि शेतीचे प्रयोगही
बीड : एखाद्या कतृत्ववान पुरुषांच्या यशात त्याची आई आणि अर्धांगीनीचा वाटा असतो असे नेहमी ऐकण्यात येते. पण, प्रा. संगीता ठोंबरे यांचे शिक्षण पुर्ण करुन शिक्षकी पेशापर्यंत नेत पुढे आमदारांच्या खुर्चीवर बसवण्यात त्यांचे पती प्रा. डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांचे मोलाचे पाठबळ राहीले आहे. लग्नानंतर त्यांनी आपल्या पत्नीला १२ वीच्या पुढील शिक्षण पुर्ण करायला लावून नोकरीला लावले. राजकीय योग जुळून आले आणि त्या आमदारही झाल्या. आता या दाम्पत्याने सहकार आणि शेती क्षेत्रातही लक्ष घातले आहे.
 
केज या अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघाचे दिवंगत नेत्या माजी मंत्री विमलताई मुंदडा यांनी पाच वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या अकाली निधनाने झालेल्या 2012 सालच्या पोटनिवडणुकीत भाजपने कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या प्रा. संगीता ठोंबरे यांना उमेदवारी दिली. राजकारणात नवख्या असलेल्या श्रीमती ठोंबरेंचा थोडक्या मतांनी पराभव झाला. पण, कायम जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ४० हजारांवर मतांनी विजय मिळवला. दरम्यान, वडिल सैन्यात असल्याने प्रा. ठोंबरेंचे माध्यमिक शिक्षण पंजाब, जम्मू, हरियाणा, गुजरात, पुणे, नगर अशा भागात झाले होते. यामुळे त्यांना देशाचे विविधांग पाहता आले. १२ वी पर्यंत शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांचे केज येथील रहिवाशी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक व कार्यालय प्रमुख असलेल्या डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्याशी लग्न झाले. पत्नी संगीता ठोंबेरेंची शिक्षणाची आवड पाहून विजयप्रकाशरावांनी त्यांना बळ दिले आणि पुढे संगीता ठोंबरे यांनी इंग्रजीतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण केले.

दरम्यान प्रा. ठोंबरे कोल्हापूर येथील डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालयातल्या 'स्कॉलर स्टुडंट' ठरल्या आणि एम. ए. ला त्यांना 'बी.प्लस.' मिळाला. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील राजाराम शासकीय महाविद्यालयात तासिका तत्वावर इंग्रजीच्या प्राध्यापिका, एका नामांकित खासगी शिकवणीमध्ये प्राध्यापिका म्हणून काम केले. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातही त्या शिकवत. सोलापूरच्या सोनी महाविद्यालयात त्यांनी 'कम्युनिकेशन स्किल टिचर' म्हणून काम केले. विशेष म्हणजे पुण्याच्या 'जेएसपी' महाविद्यालयातही त्यांनी इंग्रजी विषय शिकवित होत्या.

शिक्षकी पेशात चांगले काम सुरु असतानाच इकडे पोटनिवडणुक लागली आणि त्यांना उमेदवार म्हणून भाजपकडून विचारणा झाली. पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनीही लागलीच होकार दिला. पहिल्या निवडणुकीत पराभवाची ठेच लागली तरी ह्या दाम्पत्याने हार न मानता जससंपर्क सुरुच ठेवला. त्याचा फायदा त्यांना २०१४ सालच्या निवडणुकीत झाला. मोदी लाट, दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडेंची सहानुभूती आदींमुळे त्यांनी तब्बल ४० हजारांवर मतांनी विजय मिळवला. एकूणच पाहता त्यांच्या प्राध्यापिका ते आमदार या प्रवासात त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांची मोलाची साथ आहे.

आता सहकारात पाऊल
केज हा राखीव मतदार संघ आहे. पण, संस्थांच्या माध्यमातून  राजकीय पाया बळकट होऊ शकतो हे ध्यानात घेऊन या दाम्पत्याने केज तालुक्यातील लहूरी शिवारात 'लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सुतगिरणी'ची उभारणी सुरु केली आहे. ६१ कोटींवर खर्च असलेल्या सुतगिरणीच्या फाऊंडेशनचे कामही पुर्णत्वाकडे जात आहे. आगामी दोन वर्षात काम पुर्ण होऊन ही सुतगिरणी कार्यान्वित करण्याचा ठोंबरे दाम्पत्याचा मानस आहे. या माध्यमातून काही सुशिक्षित बेरोजगांना नोकऱ्या मिळण्याबरोबरच राजकीय पायाही मजबूत होण्यासही मदत होईल.

पतीच्या शेती संशोधनाचा असाही फायदा
प्रा. संगीता ठोंबरे यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरेंनी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये २२ वर्षे विविध पदांवर नोकरी केली. सहाय्यक प्राध्यापक, कार्यालय प्रमुख म्हणून सेवा बजावलेल्या प्रा. डॉ. ठोंबरेंचे २२ रिसर्च पेपर्सही प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी त्यांनी कृषी विषयातून डॉक्टरेट (पीएच. डी.) मिळवली आहे. डॉ. ठोंबरेंच्या शेती अभ्यासाचा आणि अनुभवाचा या भागातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा या हेतूने त्यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेत केजमध्ये 'भूस्वामिनी ॲग्रो कन्सल्टन्सी' ही माती परिक्षण प्रयोगशाळा उभारली आहे. या प्रयोगशाळेमुळे शेतकऱ्यांना जमिनीतील विविध घटकांची माहिती मिळेल आणि ठोंबरे दाम्पत्याचाही शेतकरी वर्गाशी संपर्क वाढण्यास मदत होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com