नाशिकच्या 'स्वाभिमानी' कार्यकर्त्यांची सदाभाऊंकडे पाठ

येत्या 21 सप्टेबरला राज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्या नव्या संघटनेचे नाव, पदाधिकारी व झेंड्याची घोषणा करणार आहेत. त्यासाठी दसऱ्याला इचलकरंजीत मेळावा होईल. त्यामुळे खोत राज्यमंत्री झाल्यावर सत्तेभोवती जमतो तसा काहींचा गोतावळा नाशिकलाही आहे. मात्र, या सबंध वादात बहुतेक कार्यकर्त्यांनी मौन बाळगत अलिप्त अलिप्त राहणेच पसंत केले.
नाशिकच्या 'स्वाभिमानी' कार्यकर्त्यांची सदाभाऊंकडे पाठ

नाशिक : खासदार राजू शेट्टी यांच्याशी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मतभेद झाले. त्यातून नवी शेतकरी संघटना जन्माला येणार आहे. मात्र नाशिकमधून 'स्वाभीमानी'चे कोणीही पदाधिकारी, नेते खोत यांच्यासोबत जाणार नाही असे चित्र आहे.

येत्या 21 सप्टेबरला राज्यमंत्री सदाभाऊ खोत आपल्या नव्या संघटनेचे नाव, पदाधिकारी व झेंड्याची घोषणा करणार आहेत. त्यासाठी दसऱ्याला इचलकरंजीत मेळावा होईल. त्यामुळे खोत राज्यमंत्री झाल्यावर सत्तेभोवती जमतो तसा काहींचा गोतावळा नाशिकलाही आहे. मात्र, या सबंध वादात बहुतेक कार्यकर्त्यांनी मौन बाळगत अलिप्त अलिप्त राहणेच पसंत केले. त्यातील काही जणांकडे खोत यांच्यावतीने चाचपणीही करण्यात आली. काही कार्यकर्त्यांना इचलकरंजी मेळाव्याचे निरोपही मिळाले आहेत. मात्र त्यातील कोणीही तिकडे फिरकणार नसल्याचे चित्र आहे.

संघटनेचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य हंसराज वडघुले. उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिपक पगार यांनी काणताही पदाधिकारी नव्या संघटनेत जाणार नाही. त्याविषयी काणीही चर्चाही करीत नाहीत असे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटना पश्‍चिम महाराष्ट्रात सक्रीय आहे. त्या भागात ऊसदरावरुन वर्षातून एकदा आंदोलन होते. सर्व अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून असल्याने हे शेतकरी संघटीत आहे. मात्र, शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेची पाळेमुळे नाशिकमध्ये रुजली होती. येथे कांदा, द्राक्ष, भाजीपाला अशा विविध पिकांचा प्रश्‍न सतत निर्माण होतो. सतत शासनाशी संघर्ष होतो. संघटनेला सतत सक्रीय रहावे लागते. शेतकरीही सतत अस्थिर असतात. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्यासमवेत नाशिकमधून कोण जाते याची उत्सुकता होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com