बालमृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक : कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा रुग्णालयात अठरा इन्क्‍युबेटर्स आहेत. मात्र, त्रेपन्न बालके उपचार घेत असल्याने एका इन्क्‍युबेटरमध्ये तीन ते चार बालके ठेवली जातात. येथे ऑगस्ट महिन्यात 346 बालके उपचारासाठी आली. त्यातील 55 बालेक दगावली. गेल्या पाच महिन्यांत 1498 बालके दाखल झाली. त्यात 187 बालके दगावली आहेत.
बालमृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक : कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या तुटवड्यामुळे ऑगस्टा महिन्यात 55 अर्भके दगावली होती. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा रुग्णालयात जाऊन निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निधी येऊनही महापालिकेच्या अडवणुकीमुळे काम रखडल्याचा दावा प्रशासनाने केला. आमदार जयंत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे या प्रकरणी कारवाईची मागणी केली.

जिल्हा रुग्णालयात अठरा इन्क्‍युबेटर्स आहेत. मात्र, त्रेपन्न बालके उपचार घेत असल्याने एका इन्क्‍युबेटरमध्ये तीन ते चार बालके ठेवली जातात. येथे ऑगस्ट महिन्यात 346 बालके उपचारासाठी आली. त्यातील 55 बालेक दगावली. गेल्या पाच महिन्यांत 1498 बालके दाखल झाली. त्यात 187 बालके दगावली आहेत. उत्तर प्रेदशातील गोरखपूर व फरुखाबदचे प्रकरण ताजे असताना नाशिकमध्ये ही स्थिती आढळली. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

यासंदर्भातील वृत्त प्रसारित झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांसह पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धडक देत याविषयावर नाराजी व्यक्त केली. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी त्यांना माहिती दिली. शहरातील तसचे महापालिक रुग्णालयांतूनही बालके उपचारासाठी येतात. हे प्रमाण अधिक आहे. या कक्षासाठी 21 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. मात्र, ज्या जागेवर कक्ष उभा करायचा आहे तेथील झाडे तोडण्यास महापालिका परवानगी देत नाही. अशी तक्रार डॉ. जगदाळे यांनी केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बाल कक्ष तसेच रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com