ऊर्जामंत्र्यांविरोधात फिर्याद घेण्याच्या आग्रहाने पोलिस प्रशासनाची धांदल

'विजेच्या भारनियमनामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याला सर्वश्री ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच जबाबदार आहेत. त्यांचे नियोजन नसल्यानेच कोळशाची समस्या उदभवली. त्यामुळे त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करून घ्या,' असा आग्रह धरीत केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी पाथर्डी पोलिस निरीक्षकांची चांगलीच तारांबळ उडविली.
ऊर्जामंत्र्यांविरोधात फिर्याद घेण्याच्या आग्रहाने पोलिस प्रशासनाची धांदल

नगर : 'विजेच्या भारनियमनामुळे ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याला सर्वश्री ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच जबाबदार आहेत. त्यांचे नियोजन नसल्यानेच कोळशाची समस्या उदभवली. त्यामुळे त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करून घ्या,' असा आग्रह धरीत केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी पाथर्डी पोलिस निरीक्षकांची चांगलीच तारांबळ उडविली.

वीज वितरण कंपनीकडून माहिती घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे पाथर्डीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले, मात्र ढाकणे यांनी फिर्याद नोंदवून घेण्याचा आग्रहच धरला. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. 'एक सर्वसामान्य ग्राहक म्हणून माझी तक्रार आहे. मी माळी बाभूळगाव येथील रहिवासी असून, विजग्राहक आहे. गेल्या वर्षभरापासून वीज पुरवठा खंडित होणे, भारनियमन करणे, दिवसातून आठ ते बारा तास भारनियमन केल्यामुळे आमचे मोठे नुकसान होत आहे. मंत्री बावनकुळे यांचे नियोजन नसल्यानेच हा प्रश्न उदभवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,' असे म्हणत त्यांनी निरीक्षक चव्हाण यांना पेचात टाकले.

येत्या पाच दिवसांत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही, तर आपण न्यायालयात जाऊ, असा इशारा दिल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या वेळी उपस्थित असलेल्या नगरसेवक बंडू बोरुडे, महेश बोरुडे, संजय डोमकावळे आदींनीही हीच भूमिका घेतली. त्यामुळे आगामी काळात याबाबत आंदोलने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com