Maharashtra Political News Dilip Kamble | Sarkarnama

मेळाव्याला दांडी मारणाऱ्या मंत्री दिलीप कांबळेंविषयी नाराजी

दत्ता झगडे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती व दलित महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्त पारनेर येथे मातंग समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्धाटन राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते होणार होते, मात्र मंत्री कांबळे हे राळेगण सिध्दी येथे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करुन गेले. पण राळेगण सिध्दी पासून अकरा किलो मीटर अंतरावर असलेल्या पारनेर येथील मेळाव्याला आले नाहीत.

पारनेर : राज्याचे समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी राळेगण सिध्दी येथे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली, मात्र पारनेर येथे दलित महासंघाने आयोजीत केलेल्या मातंग समाजाच्या मेळाव्याला दांडी मारली. त्यामुळे समाजाला फसवणाऱ्यांना समाजही माफ करीत नाही मग तो आमदार असो किंवा मंत्री अशी नाराजी दलित महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पुष्पा सकट यांनी मेळाव्यात बोलताना व्यक्त केली.

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती व दलित महासंघाच्या वर्धापनदिनानिमित्त पारनेर येथे मातंग समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्धाटन राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते होणार होते, मात्र मंत्री कांबळे हे राळेगण सिध्दी येथे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करुन गेले. पण राळेगण सिध्दी पासून अकरा किलो मीटर अंतरावर असलेल्या पारनेर येथील मेळाव्याला आले नाहीत. मंत्री कांबळे यांनी त्यांच्या ऐवजी भाजपचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा अश्विनी थोरात, डॉ. अजित लंके, कृष्णकांत बडवे या भाजप पदाधिकाऱ्यांना मेळाव्याला उपस्थीत राहण्यास सांगितले.

दलित महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पुष्पा सकटे यांनी कांबळेच्या अनुपस्थिती विषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. दलित महासंघाचे कार्यकर्ते पंधरा- पंधरा दिवस मंत्र्यांनी कार्यक्रमाला यावे यासाठी मागे लागतात. मंत्री देखील शेवटपर्यंत मी येणार असे सांगतात आणी शेवटी समाजाच्या लोकांची फसवणूक करता अशा शब्दात टिका केली. यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे, जिल्हाध्यक्ष नामदेव चांदणे, उपाध्यक्ष राजाराम काळे आदी उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख