औरंगाबाद काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

शहराध्यक्ष नामदेव पवार व जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे सातत्याने स्वतंत्रपणे आंदोलन करतांना दिसतात. काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या परभणी व नांदेड येथील दौऱ्यावेळी शहरातून दोन हजार पदाधिकारी नांदेडला गेले होते. याची माहिती देण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष नामदेव पवार यांची अनुपस्थिती सर्वांना खटकली होती.
औरंगाबाद काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या गोटात सारे काही आलबेल नाही. अगदी आंदोलनाच्या वेळीही ही गटबाजी ठळकपणे दिसून येते. आज झालेल्या महागाईच्या विरोधातील आंदोलनात पुन्हा एकदा काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली.

शहराध्यक्ष नामदेव पवार व जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार हे सातत्याने स्वतंत्रपणे आंदोलन करतांना दिसतात. काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या परभणी व नांदेड येथील दौऱ्यावेळी शहरातून दोन हजार पदाधिकारी नांदेडला गेले होते. याची माहिती देण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष नामदेव पवार यांची अनुपस्थिती सर्वांना खटकली होती. या शिवाय पवार आणि सत्तार हे एकाच पक्षात असले तरी त्यांची आंदोलन मात्र नेहमीच वेगवेगळी होतात. जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार व त्यांच्या समर्थकांनी क्रांतीचौकातील आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने ते पुन्हा सिध्द झाले आहे.

दरम्यान, 'गॅस छोडो, चुल्हा जलाओ, मोटार छोडो सायकल चलावो, तीन साल मे क्‍या किया, मन की बात मे वक्त गया' अशी घोषणाबाजी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आज पेट्रोल-डिझेल व गॅसच्या भडकलेल्या किमंती विरोधात रस्त्यावर उतरले होते.

काँग्रेसने क्रांतीचौकात तर राष्ट्रवादीने पैठणगेट येथे निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यात चूल मांडून सरकारचा निषेध केला. 'देशातील इतर राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमंती कमी असतांना महाराष्ट्रात मात्र दहा ते बारा रुपयांनी पेट्रोल महाग विकले जात आहे. काँग्रेसच्या काळात साडेतीनशे चारशे रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातशे साडसातशे रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. देशात उसळलेल्या महागाईमुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले आहे,' असा आरोप काँग्रेसने यावेळी केला. शहरअध्यक्ष नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महागाई विरोधातील मोर्चात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पैठणगेट येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'अब की बार, जेब पे वार' अशी घोषवाक्‍य लिहलेले निषेधाचे फलक झळकवत आंदोलन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com