राज्यातील 101 एसीपींच्या बदल्या, 33 प्रोबेशनरींत तीन आयपीएसही - Maharashtra police : 101 ACP & DYSP transferred | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील 101 एसीपींच्या बदल्या, 33 प्रोबेशनरींत तीन आयपीएसही

सरकारनामा
गुरुवार, 11 जुलै 2019

..

पिंपरी :  राज्यातील 101 सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) राज्य सरकारने आज बदल्या केल्या.त्यात तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधिक्षक)आहेत. 

पुण्यातील समीर नजीर शेख (नाशिक), प्रकाश टिपरे (सोलापूर), डॉ. शिवाजी पंडितराव पवार (उपविभागीय अधिकारी, नालासोपारा उपविभाग, पालघर) या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. तर, एकेक एसीपी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदलून आले आहेत.

बदली झालेले अधिकारी नाव आणि कंसात कोठुन कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे. 

अरूण रामभाऊ जगताप (पोलिस उप अधीक्षक, मुख्यालय,नगर ते पोलिस उप अधीक्षक मुख्यालय, नागपूर ग्रामीण),

वैशाली विठ्ठल शिंदे (एसीपी, सोलापूर शहर ते एसीपी, पुणे शहर),

अनिकेत गंगाधर भारती (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते पोलिस उप अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे),

संजय भाऊसाहेब नाईक-पाटील (बार्शी उपविभाग, सोलापूर ते एसीपी, पिंपरी-चिंचवड), 

डीवायएसपी गडहिंग्लज अनिल कदम, राहुल धस (उमरगा), संदीप गावित (शिरपूर),  अशोक थोरात (संगमनेर) आणि अर्जुन भोसले (गेवराई) यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत मात्र त्यांच्या बदलीचे ठिकाण दिलेले नाही. ते नंतर देण्यात येणार आहे, असे गृहविभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख