महाराष्ट्रात नाणं चालत ते राज ठाकरेंचे आणि राष्ट्रवादीचेच  : सुप्रिया सुळे 

सत्ताधाऱ्यांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची भिती वाटत आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे लोक फोडण्याच्या मागे लागलेले आहेत. -सुप्रिया सुळे
Raj-Thakare-supriya-sule
Raj-Thakare-supriya-sule

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून काही लोक जात आहेत, तरीही आमच्या पक्षाबाबतच विचारणा केली जात आहे, राज ठाकरेंच्या पक्षाच्या आज एकही आमदार नाही तरीही त्यांच्या 'इडी'चौकशी बाबत तब्बल 72 तास मिडीयावर कव्हरेज चालंल. त्यामुळे हे आता दिसून आल आहे काही झाले तरी महाराष्ट्रात  नाणं राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरेंचे चालत.

याच कारण म्हणजे आमच्याबाबत जनतेत विश्‍वास आहे. भाजपवाल्याना मात्र प्रसिध्दीसाठी पूरग्रस्त भागात सेल्फी काढण्यासाठी जाव लागत हे त्यांच दुर्दैव आहे,  असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. 

जळगावात राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. संवाद यात्रेनिमित्ताने आज त्या जळगावात आलेल्या होत्या. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोंजित पक्षाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी विधानसभेचे माजी सभापती अरूणभाई गुजराथी, मंत्री मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र पाटील, गफ्फार मलीक आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना सुप्रिया सुळे  म्हणाल्या,  पक्षातून आज काही लोक जात आहेत,मात्र कार्यकर्त्यांनी डगमगून जावू नये. आपण लढणारे आहोत. कॉपी करणारे नाही. आपले कायकर्ते घेवून ते पास होत आहेत. त्या पास होण्याला काहीही अर्थ नाही. 

भारतीय जनता पक्षावर टिका करतांना खासदार सुळे म्हणाल्या , भाजपचे नेते म्हणतात आमच्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आमची संघटना बळकट आहे. भाजप जर खरोखरच बळकट असेल तर मग इतर पक्षातील लोक तुम्ही का फोडता आहात.? तुमच्याच पक्षातील लोकांना तुम्ही संधी का देत नाहीत. आयत्या बिळावर नागोबा तुम्ही का बसविता आहात?  असा सवालही त्यानी केला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक फोडण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे सांगून खासदार सुळे  म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसची भिती वाटत आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे लोक फोडण्याच्या मागे लागलेले आहेत. आमच्या पक्षाबद्दल जनतेतून विचारणा होत आहे. प्रसिध्दी माध्यमातूनही चर्चा होत आहे.

खासदार सुळे  म्हणाल्या, राज ठाकरेच्या बाबततही तसच आहे. आज त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही, मात्र 'इडी' चौकशीला जात असतांना मिडीयाने तब्बल 72 तास त्यांची कव्हरेज दिलं. कारण जनतेत त्यांच्याबाबत विश्‍वास आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व राज ठाकरे हे चालणारं नाण आहे.

भाजपचे मात्र तसे नाही त्याच्या पक्षाचे लोक सांगली, कोल्हापूर भागात पूरग्रस्तांच्या मदतीला जाण्याच्या नावाखाली सेल्फी काढून प्रसिध्द मिळवितात. हा अत्यंत किळसवाणा प्रकार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com