Maharashtra News NCP Leader Supriya Sule to Tour Six Districts | Sarkarnama

खासदार सुप्रिया सुळे यांचा उद्यापासून संवाद दौरा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा उद्यापासून (ता.२३) पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्हयामध्ये संवाद दौरा सुरू होत आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरु असतानाच हा वैयक्तिक संवाद दौराही काढण्यात आल्याने त्याविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा उद्यापासून (ता.२३) पहिल्या टप्प्यात राज्यातील सहा जिल्हयामध्ये संवाद दौरा सुरू होत आहे. पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरु असतानाच हा वैयक्तिक संवाद दौराही काढण्यात आल्याने त्याविषयी आकर्षण निर्माण झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या राज्यात भाजपची महाजनादेश, तर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या यात्रेचा पहिला टप्पा झालेला आहे. तर कॉंग्रेसही भाजपच्या यात्रेला उत्तर म्हणून पोलखोल यात्रा काढणार आहे. अशा प्रमुख राजकीय पक्षांच्या यात्रा सुरु असताना आता वैयक्तिक राजकीय नेत्यांच्या यात्रेची त्यात सुप्रिया सुळे यांच्या संवाद यात्रेमुळे पडणार आहे.

पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, एकूणच ढिसाळ प्रशासकीय कारभार व सामान्यांप्रती सरकारी अनास्था या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांतील बहुविध घटकांशी संवाद साधण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवीमुंबई या जिल्हयात सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख