आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकऱ्यांत प्राधान्य - दिवाकर रावते

आत्महत्याग्रस्त शेतकरी हा खरे तर व्यवस्थेचा बळी असतो. अत्यंत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अनेक शेतकरी आत्महत्येसारखा चुकीचा मार्ग अवलंबतात. पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे आणि मुलाबाळांचे मोठे हाल होतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यां कुटूंबियांसाठी सुरुवातीस परिवहन विभागाच्यावतीने रिक्षा परवाने दिले. आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकिय नोकरीत प्राधान्य देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे - दिवाकर रावते
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकऱ्यांत प्राधान्य - दिवाकर रावते

मुंबई : शासकीय नोकऱ्यांमध्ये गट 'क' च्या कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यामुळे अडचणीत असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

दिवाकर रावते म्हणाले, "आत्महत्याग्रस्त शेतकरी हा खरे तर व्यवस्थेचा बळी असतो. अत्यंत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अनेक शेतकरी आत्महत्येसारखा चुकीचा मार्ग अवलंबतात. पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे आणि मुलाबाळांचे मोठे हाल होतात. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यां कुटूंबियांसाठी सुरुवातीस परिवहन विभागाच्यावतीने रिक्षा परवाने दिले. आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासकिय नोकरीत प्राधान्य देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. आता शासनातील सर्वच विभागांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून यासंदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी केली होईल.''
ते पुढे म्हणाले, ''हा प्रस्ताव सादर करताना त्याचे महत्व लक्षात घेऊन शासनाच्या सर्वच विभागांसाठी हा निर्णय घेण्यात यावा, असे सूचविले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग यांच्या शिफारशीनंतर या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.'' या महत्वाच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल रावते यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com