Maharashtra: Mumbai Police makes use of drones to monitor the situation | Sarkarnama

DRONES TO MONITOR THE SITUATION : मुंबई पोलिसांनी घेतली " ड्रोन'ची मदत 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाचे रूग्ण कुठे आहेत हे पाहण्याबरोबरच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीला ड्रोन धावला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कडकडीत बंद आहे. तसेच कोरोनाचे रूग्णही वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आपल्या मदतीला ड्रोनही घेतला आहे.

मुंबईत नेहमीच गजबजलेली आणि लाखो लोकांमुळे फुललेली दिसते. आजमात्र रस्ते सामसुम आहेत. तरीही काही मंडली लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाही. कोरोनाचे रूग्ण कुठे आहेत हे पाहण्याबरोबरच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीला ड्रोन धावला आहे.

काही इमारतीमध्ये या ड्रोनचा उपयोग करण्यात आला. या ड्रोनचीही देशभर चर्चा सुरू आहे.

14 एप्रिलपर्यंत संपूर्ण रेल्वेसेवा ठप्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर रेल्वे मंत्रालयानेही तसे आदेश काढले आहेत. त्यामुळे मुंबई लोकल सेवेसह एक्‍स्प्रेस, मेल, मेमू, डेमू आदी रेल्वे सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती.

या दरम्यान मुंबईतील लोकल सेवेसह, एसटी आणि खासगी बसगाड्यांची सेवाही बंदचे राज्य शासनाने आदेश दिले होते.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्याने आता राज्यातील वाहतूकबंदी 14 एप्रिलपर्यंत वाढणार आहे. त्याबाबतचे आदेश रेल्वे मंत्रालयाने काढले असून लोकल, लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस, मेट्रो सेवा 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

विमान सेवाही बंद राहणार आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवासुद्धा 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली होती; मात्र पंतप्रधानांच्या घोषणेनंतर विमानसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख