Maharashtra Medical Team Started Help in Kerala | Sarkarnama

गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये वैद्यकीय मदतीला प्रारंभ

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

केरळमध्ये अतीवृष्टीमुळे कोसळलेल्या संकटावर मात करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. साऱ्या देशातून मदतीचा ओघ केरळकडे जातो आहे. महाराष्ट्रही यात मागे नाही. राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री डाॅ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक केरळमध्ये पोहोचले असून तिथे वैद्यकीय सहाय्याला प्रारंभ झाला आहे. 

मुंबई - केरळमध्ये अतीवृष्टीमुळे कोसळलेल्या संकटावर मात करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. साऱ्या देशातून मदतीचा ओघ केरळकडे जातो आहे. महाराष्ट्रही यात मागे नाही. राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री डाॅ. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक केरळमध्ये पोहोचले असून तिथे वैद्यकीय सहाय्याला प्रारंभ झाला आहे. 

काळ हवाईदलाच्या विशेष विमानाने हे पथक केरळला रवाना झाले. सोबत मदतीची सामग्री व औषधोपचारांचे साहित्य पाठविण्यात आले आहे. एर्नाकुलम, पठणमथित्ता आणि त्रिचूर येथे तीन पथके कार्यरत राहणार आहेत. जे.जे हाॅस्पीटलचे डीन डाॅ. तायडे यांच्या नेतृत्वाखालील 81 डाॅक्टरांचे पथक केरळला पाठविण्याल आले आहे. हे पथक तिथे पोहोचले असून मदतीला प्रारंभ झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर म्हटले आहे. सैन्यदलाचे जवान ज्या पद्धतीने प्रवास करतात त्याच पद्धतीने या पथकाने हवाईदलाच्या विमानात दाटीवाटीने बसून प्रवास केला. त्यात जिद्द होती केरळमधल्या पूरग्रस्त बांधवांना त्यांच्या संकटातून बाहेर काढण्याची. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख