संभाजी भिडे यांच्यावरही कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळला 

मिलिंद एकबोटे प्रमाणेच संभाजी भिडे यांच्यावरही कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव विधान परिषदेत आज फेटाळनयेत आला .
NCP-Vidya-Chavan
NCP-Vidya-Chavan

मुंबई : मिलिंद एकबोटे प्रमाणेच संभाजी भिडे यांच्यावरही कारवाईचा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव विधान परिषदेत आज  फेटाळनयेत आला . 

भिमा-कोरेगाव घटनेसंदर्भात मिलिंद एकबोटे यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे नाईलाजाने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यात सरकारचे कोणतेही श्रेय नाही. पण आता एकबोटे यांच्याप्रमाणेच भिडे यांच्यावरही कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, अॅड. जयदेव गायकवाड ,प्रकाश गझबिये  यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. दरम्यान, हा स्थगन प्रस्ताव फेटाळण्यात आला.

नियम ९७ अन्वये मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत निवेदन केले होते. या निवेदनात तक्रार दाखल असलेले मनोहर भिडे यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. मुख्यमंत्र्यांनी संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्या नावाचा उल्लेख टाळला, असा आरोपही या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधिमंडळात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com