राणेंच्या जागी कोण ? उद्या फैसला ! आमदार नितेश राणेंच मत कुणाला ? - Maharashtra legislative assembly election Will laad win ? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

राणेंच्या जागी कोण ? उद्या फैसला ! आमदार नितेश राणेंच मत कुणाला ?

ब्रह्मा चट्टे : सरकारनामा न्यूज ब्यूरो
बुधवार, 6 डिसेंबर 2017

विधानसभेतील संख्याबळ कमी असतानाही गुजरात निवडणुकीच्या काळात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून कॉंग्रेसने दिलीप माने यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. लाड यांचा विजय निश्‍चित मानला जात असतानाही दोन्ही कॉंग्रेसची मते फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी भाजप नेते आणि लाड प्रयत्न करत आहेत. 

मुंबई  : बहूचर्चित विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत उद्या मतदान होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणें यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर कोण विजयी होणार याबाबत राजकिय वर्तुळात उत्सुकता आहे. तर राणें पुत्र आमदार नितेश राणें कुणाला मतदान करणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

उद्या गुरूवारी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. लगेचच सायंकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. या पोटनिवडणूकीसाठी भाजपने प्रसाद लाड यांना रिंगणात उतरवले तर काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना संधी दिली आहे. 

शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचे पारडे जड आहे. त्यामुळे जिकण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने चमत्कार करणार का ? मानेंच्या मदतीला अदृश्य "बाण" येतात की पुन्हा भाजपला अदृश्य "हात" मदत करतात हे पहावे लागणार आहे.

नारायण राणे यांनी राजीनामा देत नविन पक्षाची स्थापना करत एनडीएत प्रवेश केला आहे. त्यामुळे "काँग्रेस"चे आमदार असणारे राणेपुत्र नितेश राणे व राणेंचे समर्थ कालिदास कोंळबकर आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार याबाबत उत्सुकता आहे. त्याबरोबर राष्ट्रवादीने निलंबित केलेले आमदार रमेश कदम यांचे मतही भाजपच्या पारड्यात जाणार का हे पहाणे औत्सुक्याचे आहे.

सध्या विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63 , काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 3 , अपक्ष 7, एमआयएमचे 2 तर; सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ आकडा पार करावा लागणार आहे. 

नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडल्यानंतर भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता होती. मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे उमेदवारीची माळ लाड यांच्या गळ्यात पडली. लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ' मातोश्री'वर भेट घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मिळवल्याने त्यांचे पारडे जड आहे. 

  भाजपचे 122 व शिवसेनेच्या 63 मतांसह प्रसाद लाड यांच्या पार्ड्यात सध्या 185 मते दिसत आहेत. शिवाय अपक्ष 20 मतेही प्रसाद लाड यांच्याकडेच वळण्याची शक्यता राजकिय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळे दिलीप मानेंचा पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यातच काँग्रेस राष्ट्रवादींची मिळून 83 मते होतात. 

विधानसभेतील संख्याबळ कमी असतानाही गुजरात निवडणुकीच्या काळात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून कॉंग्रेसने दिलीप माने यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. लाड यांचा विजय निश्‍चित मानला जात असतानाही दोन्ही कॉंग्रेसची मते फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यासाठी भाजप नेते आणि लाड प्रयत्न करत आहेत. 

सध्या विधानसभेत असणारे पक्षीय बलाबल पुढील प्रमाणे-

भाजप - 122
शिवसेना- 63
काॅग्रेस- 42
राष्ट्रवादी- 41
शेकाप- 3
बविआ- 3
एमआयएम- 2
अपक्ष- 7
सपा- 1
मनसे- 1
रासपा- 1
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया- 1

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख