2014ची निवडणूक जीवनातील 'टर्निंग पॉइंट' - रक्षा खडसे

रावेर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा खासदार रक्षा खडसेंनी आज त्यांचा राजकीय जीवन प्रवास, खासदार म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेत आगामी काळातील विकासाचे 'व्हीजन'ही मांडले. 'सरकारनामा'च्या फेसबुक पेजवर 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी महाराष्ट्रातील तरुण व प्रभावशाली नेतृत्व असलेल्या रक्षा खडसेंची विविध मुद्यांवर मुलाखत घेतली आणि त्यातून त्यांनी आपली भूमिका मांडली.
2014ची निवडणूक जीवनातील 'टर्निंग पॉइंट' - रक्षा खडसे

                 सरकारनामा फेसबूक लाइव्हमधून उलगडला प्रवास 
जळगाव : खडसे कुटुंबाची सून झाल्यानंतर सरपंच पदापासून राजकीय प्रवास सुरु झाला. खडसे नावाचे वलय होते, मात्र बाबांनी (एकनाथराव खडसे) राजकारणात काही बनायचे असेल तर तुला स्वत:चे अस्तित्व तयार करावे लागेल, ही दिलेली शिकवण मार्गदर्शक ठरली. 2014ला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली आणि तोच राजकीय जीवनातील 'टर्निंग पॉइंट' ठरला, असे सांगत खासदार रक्षा खडसे यांनी आज 'सरकारनामा'च्या फेसबुक लाइव्ह मुलाखतीतून आपला जीवनपट उलगडला. 

रावेर लोकसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा खासदार रक्षा खडसेंनी आज त्यांचा राजकीय जीवन प्रवास, खासदार म्हणून केलेल्या कार्याचा आढावा घेत आगामी काळातील विकासाचे 'व्हीजन'ही मांडले. 'सरकारनामा'च्या फेसबुक पेजवर 'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी श्रीमती खडसेंची विविध मुद्यांवर मुलाखत घेतली आणि त्यातून त्यांनी आपली भूमिका मांडली.

...असा सुरु झाला राजकीय प्रवास
यावेळी आपला प्रवास मांडताना त्या म्हणाल्या, मुक्ताईनगर तालुक्‍यातील कोथळी या गावच्या सरपंचपदापासून राजकीय प्रवास सुरु झाला. राजकारण हे सत्तेचे साधन नव्हे तर समाजसेवेचे माध्यम मानले पाहिजे. त्यातूनच ग्रामीण भागातील प्रश्‍न, अडचणी, लोकांच्या समस्या त्यावेळी जाणून घेतल्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. पुढे जिल्हापरिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही. जिल्हा परिषदेत आरोग्य व शिक्षण समिती सभापतिपदाची धुरा सांभाळताना संपूर्ण जळगाव जिल्हा कार्यक्षेत्र बनले. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बाबा (नाथाभाऊ) आणि पती निखिल यांची भक्कम साथ होती. पद असो की नसो आपण लोकांमध्ये मिसळले पाहिजे, गावापर्यंत संपर्क ठेवला पाहिजे, ही बाबांची शिकवण होती. त्याच मार्गावरुन वाटचाल सुरु झाली. 

लोकसभा निवडणुकीचे आव्हान
जीवनातील चढ-उतार आणि घटनांबद्दल भावनिक होत रक्षा खडसे म्हणाल्या, ''नुकताच हा प्रवास सुरु झालेला असताना 2013ला निखिल यांचे दुर्दैवी निधन झाले. मुलगी सहा तर मुलगा गुरुनाथ अवघ्या दीड-दोन वर्षांचा. कसे होणार? हा प्रश्‍न होता. मात्र, बाबांसह कुटुंबीय, समाजाने त्यावेळी आधार दिला. समाजातील अन्य महिलांचे दु:ख पाहून आपले दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला. आणि लगेच 2014ला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचा विषय समोर आला. ही निवडणूक आव्हान होते. त्यावेळी देशभरात नरेंद्र मोदींची लाट होती, वातावरण अनुकूल होते. मात्र व्यक्तिश: माझी मानसिकता नव्हती. अशा स्थितीत ही निवडणूक लढवली आणि संसदेत प्रवेश केला." 

लोकसभेतील अनुभव वेगळाच
पहिल्यांदाच खासदार म्हणून लोकसभेतील प्रवेशाचा तो अनुभव वेगळाच होता. देशभरातून आलेल्या तज्ज्ञ, अनुभवी राजकीय नेत्यांमध्ये आपण कुठे आहोत, याची जाणीव झाली. आपल्या भागातील प्रश्‍न, समस्या यापेक्षा देशाचे प्रश्‍न ज्या व्यासपीठावरुन चर्चिले जातात, तेथील कामाचा अनुभव व्यापक व मोठा होता, असे त्या म्हणाल्या. 

#प्रभावी नेते #युवानेतृत्व #Sarkarnama #नातंशब्दांशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com