अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा सन्मान करणारा शरद पवार यांच्या सारखा दुसरा नेता मी पाहिला नाही : जितेंद्र आव्हाड 

राष्ट्रवादी काँग्रेसचे लढाऊ आणि प्रभावी नेतृत्व डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी आज सरकारनामा फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. आपल्या सामाजिक - राजकीय वाटचालीला त्यांनी या माध्यमातून उजाळा दिला. सकाळचे विशेष प्रतिनिधी संजय मिस्कीन यांनी आव्हाड यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलते केले.
अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा सन्मान करणारा शरद पवार यांच्या सारखा दुसरा नेता मी पाहिला नाही : जितेंद्र आव्हाड 

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे लढाऊ आणि प्रभावी नेतृत्व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज 'सरकारनामा' फेसबुक लाइव्हमध्ये आपला राजकीय प्रवास उलघडतानाच वेळोवेळी केलेल्या आंदोलनाच्या आठवणींनाही उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माझे सर्वेसर्वा असल्याचे स्पष्ट करतानाच याच पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्‌मसिंह पाटील आणि माजी मंत्री सुरेश कलमाडी याचेही आपल्या राजकीय वाटचालीत महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. 

डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलाखतीचा हा पहिला भाग - 

- लहानपणापासूनच आपण संघर्षमय जीवनाला सुरवात केली आहे. एका भाजीविक्रेतेचा मुलगा ते राजकीय नेता हा प्रवास कसा वाटतो ? 
आव्हाड : हे सर्व आश्‍चर्यकारक आहे. खरं सांगू का ! माझ्या घरच्यांची मी राजकारणात जावं अशी अजिबात इच्छा नव्हती. माझ्या आईवडिलांना मी आयएएस किंवा आयपीएस अधिकारी व्हावे असे वाटत होते. मी तसा प्रयत्नही केला. 1984 मध्ये यूपीएससी, एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. अगदी दोनतीन गुणांनी माझी संधी हुकली. त्यानंतर लाईन बदलली. मरिन इंजिनिअरींगलाही प्रवेश घेतला होता. माझी नवका विचित्र मार्गाने जात गेली. मी व्यावसायिक राजकारणी नाही. पॅशनिस्ट राजकारणी आहे. 

तुमचे नेतृत्व विद्यार्थी चळवळीतून पुढे आले आहे. पहिला नेता कोण ? 
आव्हाड : विद्यार्थीदशेत मला काही मंडळी भेटली. राजकारणात आलो त्याला माझे काही मित्र कारणीभूत आहेत. पण, राजकारण माझ्या घरच्यांना आवडत नव्हते. दिलीप फाटे नावाचा मित्र होता. तो शिवसेनेतून बाहेर पडला होता. गरीब घरातला होता त्याने शिवसेना सोडली होती. फाटे याच्यासह राजन गुप्ते, नितीन देशपांडे या मित्रांनी राजकारणाची ओळख करून दिली. माझी आई त्यांच्याकडे गेली होती. याला कशाला घेऊन जाता अशी ती म्हणाली होती. त्याच्यामुळे खरे तर मी राजकारणाकडे वळलो. विद्यार्थी संघटनेत काम करू लागलो. 

- राजकारणातील गॉड फादर कोण आहे ? 
आव्हाड : प्रारंभी मला कोणी गॉडफादर नव्हता आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते डॉ. पद्ममसिंह पाटील हे माझे पहिले गॉडफादर आहेत. मी आज जो काही आहे तो मुळातच त्यांच्यामुळे. तसेच माजी मंत्री सुरेश कलमाडी यांचीही मला नेहमीच साथ मिळाली. या दोन माणसामुळे राजकारणात काम करण्याची अधिक संधी मिळाली. माणसांची पारख या नेत्यांना होती. खरेतर मी काही मराठा नाही किंवा मी सहकार क्षेत्रातील नेताही नाही. माझ्या खानदानातीही कोणी राजकारणात नाही. राजकारणात यशस्वी झालो त्या मागे काही व्यक्तींनी दिलेली मोलाची साथ आहे. हे मी कधी विसरू शकत नाही. 

विचारांचा वारसा कसा आला ? 
आव्हाड : मी सांगितलेच आहे, की माझे आईवडील अशिक्षित होते. मात्र त्यांना मी उत्तम शिक्षण घ्यावे असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी मला चांगल्या शाळेत टाकले होते. मी कॉन्व्हेन्ट शाळेत होतो. मला एक आठवण सांगावीशी वाटते की एक फादर हिंदु धर्मातील लोकांचे धर्मांतर करवतात म्हणून त्यांना मारहाण केली होती. खरे त्यावेळी मुला खूप दु:ख झाले होते. मी मारणाऱ्यांना म्हणालो, जो माणूस आपला धर्म का सोडतो? याचा प्रथम आपण विचार केला पाहिजे. त्या घटनेपासून माझे मत बदलले. मी कोणत्याही धर्माला कमी लेखत नाही. माझ्या दृष्टिने मानवता ही गोष्ट सर्वात श्रेष्ठ आहे यावर मी ठाम आहे. 

-मुंबई, ठाणे शिवसेनेने जाळे निर्माण केले आहे. येथे काम करताना असा कुठला प्रसंग आठवतो का राजकारणात आव्हान स्वीकारतो ? 
आव्हाड : हे पहा पाण्यात पडलो आहे तर पोहावे लागेलच. प्रवाहाविरोधातही पोहावे लागेलच. पण, शेवटी मंझिल ठरलेली आहे. त्यामुळे खचून तर जाता येत नाही. मी लढतो आहे लढतच राहणार. प्रसंग येतात. पण, डगमगून जायचे नाही हे मी शिकलो आहे. त्यामुळेच राजकारणातही आपल्याला जे जे वाटते ते ते मी करीत आलो आहे. 

- एक आक्रमक नेता अशी आपली ओळख आहे. आंदोलनं करताना कधी पक्षातून दबाव आला का ? 
आव्हाड : माझ्या आईवडीलांच्या बरोबरीने मी एक नाव घेईन ते म्हणचे माझे साहेब शरद पवार. त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे. मी एक आठवण यानिमित्ताने सांगेन की एकदा लोकसत्ता दैनिकांने शरद पवारसाहेबांविरोधात लेख प्रसिद्ध केला होता. हा लेख साहेबांची बदनामी करणारा आहे असे मला वाटले. मला राग आला होता. मी काही सहकाऱ्यांसह 1992 मध्ये लोकसत्ताची होळी केली होती. त्यानंतर पक्षातील काही मंडळींनी माझी तक्रार केली होती. लोकसत्तेचे मालक रामनाथ गोयंका हे पवारसाहेबांचे मित्र आहेत मला काही माहित नव्हते. पण, पुढे साहेबांची भेट झाली. त्यांनी मला विचारले का लोकसत्ता जाळलास. त्यांनी स्मित केले. याला जोडून मी दुसरी घटना सांगतो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा सरकारच्या निर्णयाला मी विरोध केला. त्यावेळीही काही मंडळींनी माझी तक्रार साहेबांकडे केली. मला वाटले आपण चुकलो. मी साहेबांना फोन केला आणि माझी भूमिका स्पष्ट केली. त्यावर साहेब म्हणाले, पक्षाची भूमिका वेगळी आहे. तुझे वैयक्तिक मत असू शकते. त्यामुळे तू चुकीचे असे काही केले नाहीस. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणारा पवारसाहेबांसारखा नेता मी पाहिला नाही. त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना आहे. ती मला आज इतर कुठल्याही नेत्यांत अजिबात दिसत नाही. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com