सोनियांना पवारांनी सल्ला दिला- आधी चर्चा मग पाठिंबा : पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे जुळू नये, म्हणून भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केला. सरकार स्थापनेबाबत आम्ही आधी आमच्यात चर्चा करु व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि त्यानंतरच सत्ता वाटपाचे सूत्र, पाठिंबा यावर चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आधी चर्चा करुन मग पुढे जाण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधींना दिल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
Maharashtra Ex Cm Prithiviraj Chavan About Support to Shivena
Maharashtra Ex Cm Prithiviraj Chavan About Support to Shivena

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे जुळू नये, म्हणून भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केला. सरकार स्थापनेबाबत आम्ही आधी आमच्यात चर्चा करु व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि त्यानंतरच सत्ता वाटपाचे सूत्र, पाठिंबा यावर चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आधी चर्चा करुन मग पुढे जाण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधींना दिल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

आज शिवसेना व काँग्रेस नेत्यांत मुंबईत ट्रायडंट हाॅटेलमध्ये दीड तास चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले, "शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आला तेव्हा सोनिया गांधींनी याबाबत व्यापक चर्चा केली.  मात्र, जोपर्यंत शिवसेना एनडीएचा घटक होता तोपर्यंत चर्चा करणे शक्य नव्हते. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली. आम्ही आमदारांशी चर्चा केली आणि ते सोनिया गांधींना कळवलं. सोनिया गांधींनी त्यानंतर आम्हाला दिल्लीत बोलवलं आणि चर्चा केली. त्यावेळी आम्ही आमची मतं मांडली. सोनिया गांधींनी फोनवरही चर्चा केली. पवारांनीही उद्धव ठाकरे याच्याशी औपचारिक चर्चा केली. पण पाठिंब्याचं पत्र द्यायला तोपर्यंत उशीर झाला होता. शरद पवारांनीही म्हटलं की आधी सर्व चर्चा करू आणि पुढे जाऊ. पवारांनी सोनियांना हा सल्ला दिला. त्यानंतर आम्हीही ठरवलं की पुढे कसं जायचं ते चर्चा करून ठरवू."सरकारमध्ये जाऊन नंतर चर्चा करणं शक्य नव्हतं. त्यामुळे काँग्रेसचा ढिसाळपणा, वेळ काढला अशी टीका योग्य नव्हती, असेही चव्हाण म्हणाले.

''पहिल्यांदा किमान समान कार्यक्रमाबाबत चर्चा करावी लागेल. आधी याबाबत आमच्या पक्षात चर्चा करू, त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करू. त्यानंतर सत्ता वाटपाचे सूत्र, पाठिंबा याबाबत चर्चा होईल.  मुख्यमंत्रीपदाबाबत मी काही बोलणार नाही.  सत्ता वाटपाच्या सूत्रात या बाबी चर्चेत येतील. सोनिया गांधींनी जेव्हा हिरवा कंदील दाखवला त्यानंतर औपचारिक चर्चा सुरू झाली आहे," असे त्यांनी सांगितले.

आमच्या आघाडीचा संयुक्त जाहीरनामा आणि शिवसेनेचा वचननामा घेऊन त्यातील कोणते मुद्दे घ्यायचे कुठले वगळायचे ते ठरवावे लागेल.  किमान समान कार्यक्रम तयार करताना वादग्रस्त मुद्यांचे काय करायचे हे ठरावावे लागणार आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com