Maharashtra Corruption Analysis | Sarkarnama

राज्यात लाचखोरीत पुणे विभाग अव्वल; सहा महिन्यांत राज्यात 443 गुन्ह्यांमध्ये 588 लाचखोर जाळ्यात

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जुलै 2019

शासनाचे विविध विभाग सर्वसामान्यांसाठी कार्यरत आहेत. मात्र याच कार्यालयातील अधिकारी हे सर्वसामान्यांना लुबाडण्यासाठी बसलेले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांचा प्रशासनावरील उडणारा विश्वास कायम रहावा म्हणुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांवर कारवाई करून टाच निर्माण केली आहे.

अकोला : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकिय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. यामध्ये महसूल विभाग आघाडीवर असून, पोलिस विभाग दुसऱ्या स्थानी आहे. असे जरी असले तरी राज्यातील आठ विभागातून लाचखोरीत पुणे विभाग अव्वल असून, 95 गुन्ह्यामध्ये 124 लाचखोर हे केवळ पुणे विभागातील आहेत.

शासनाचे विविध विभाग सर्वसामान्यांसाठी कार्यरत आहेत. मात्र याच कार्यालयातील अधिकारी हे सर्वसामान्यांना लुबाडण्यासाठी बसलेले असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र नागरिकांचा प्रशासनावरील उडणारा विश्वास कायम रहावा म्हणुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांवर कारवाई करून टाच निर्माण केली आहे. मागील सहा महिन्यांत राज्यातील आठ विभागात 443 गुन्ह्यांमध्ये 588 लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकून कारवाई करण्यात आली आहे. 

असे सापडले लाचखोर
विभाग सापळा अटक

मुंबई 21 29
ठाणे 50 71
पुणे 95 124
नाशिक 53 71
नागपूर 56 73
अमरावती 61 85
औरंगाबाद 61 75
नांदेड 46 60

महसुल विभाग अव्वल
विभाग प्रकरणे
महसूल 103
पोलिस 98
महानगरपालिका 26
जिल्हा परिषद 25
पंचायत समिती 40
वन विभाग 11

या विभागात नाही सापडले लाचखोर
राज्यात लाचखोरांनी उच्चांक जरी गाठला असला तरी काही विभागात मात्र सहा महिन्यांत एकही लाचखोर सापडला नसल्याची माहिती आहे. यामध्ये नगरपालिका, अन्न व औषध विभाग, महात्मा फुले मागासवर्गीय विभाग, महाराष्ट्र औद्यागिक महामंडळ, प्रदुषण नियंत्रण मंडळ, बेस्ट', उच्च तंत्रशिक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बंदर विभाग या विभागात सर्वभरात एकही लाचखोर आढळला नाही. मात्र या विभागात भ्रष्टाचार होत नाही असेही म्हणता येणार नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख