#CoronaEffect मुख्य सचीव अजोय महेता यांना मुदतवाढ? - Maharashtra Chief Secretary Ajoy Mehta May Get Extension | Politics Marathi News - Sarkarnama

#CoronaEffect मुख्य सचीव अजोय महेता यांना मुदतवाढ?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी अजोय महेता यांना मिळालेल्या मुदतवाढीत कोरोना संकटाचे सावट लक्षात घेता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी अजोय महेता यांना मिळालेल्या मुदतवाढीत कोरोना संकटाचे सावट लक्षात घेता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र हे सर्वाधिक बाधित राज्यांपैकी एक आहे.मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढू नये याची काटेकोर काळजी घेणे आवश्यक आहे.

अजोय महेता हे अत्यंत कुशलतेने महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा समन्वय साधत शक्य त्या सर्व उपाययोजना अंमलात आणत आहेत.संकटकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नवा अधिकारी नेमण्याऐवजी कुशल प्रशासक अधिकारपदावर असणे आवश्यक आहे.त्यासाठी महेता यांनाच मुदतवाढ मिळणे लाभदायक असेल, असे राज्य सरकारचे मत आहे.

मुदतवाढीसंबंधीचा पत्रव्यवहार कोरोनासंकटाअगोदर करण्यात आला होता.पंतप्रधान कार्यालयही महेता यांच्या कामावर खूष आहेत.राज्याच्या मुख्य सचिवपदावरील व्यक्तीला सतत मुदतवाढ देणे नियमाला धरून नसल्याने आता महेता निवृत्त होणार असे वाटत असतानाच कोरोनामुळे परिस्थिती बदलली असे मानले जाते. या संबंधीचा निरोप लवकरच अधिकृतपणे मिळेल काय या कडे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख