नागपूर अधिवेशनानंतर होणार मंत्रीमंडळ विस्तार : अजित पवार (व्हिडिओ)

आत्ता जे खाते वाटप झाले आहे ते काही काळा पुरत आहे. नागपूरला प्रश्न निर्माण झाले तर त्या प्रश्नाचे उत्तर कोणी द्यायचे हा प्रश्न त्यामुळे उरणार नाही. सुदैवाने अनुभवी आहेत. काही जणांनी दहा आणि पंधरा वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही, असे अजित पवार यांनी पिंपरी येथे बोलताना सांगितले.
Cabinet Expansion will be after Nagpur Session Say Ajit Pawar
Cabinet Expansion will be after Nagpur Session Say Ajit Pawar

पिंपरी : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनानंतर होईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरीत बोलताना दिली. राज्यात करायच्या कामांबाबतचे स्पष्ट चित्र डिसेंबर अखेरपर्यंत समोर येईल. तिन्ही पक्षांनी मंत्री मंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर करण्याची मानसिकता तयार केलेली आहे, असे ते म्हणाले. 

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, "आत्ता जे खाते वाटप झाले आहे ते काही काळा पुरत आहे. नागपूरला प्रश्न निर्माण झाले तर त्या प्रश्नाचे उत्तर कोणी द्यायचे हा प्रश्न त्यामुळे उरणार नाही. सुदैवाने अनुभवी आहेत. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, मागच्या पाच वर्षांच्या सरकार च्या काळात होते. छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत व बाळासाहेब थोरात हे पूर्वी आघाडीच सरकार मध्ये होते. काही जणांनी दहा आणि पंधरा वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही."  कामकाज सल्लागार समितीने सोमवार ते शनिवार कार्यक्रम दाखवलेला आहे. त्या काळात विधीमंडळाच्या माध्यमातून जनतेला महाविकास आघाडीची भूमिका काय आहे हे समजून जाईल, असेही अजित पवार म्हणाले. 

पिंपरी चिंचवडच्या प्रश्नांबाबत बोलताना ते म्हणाले, "राज्यात महाविकास आघाडी या महापालिकेत पूर्ण बहुमतात भाजप अशी स्थिती आहे. मी २० वर्षे शहराचे नेतृत्व केले आहे. शहराच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारण न आणता काम करावे लागेल.  काही अधिकारी राज्य शासन नेमते. आमचे अण्णा बनसोडे आहेत. शिवसेनेचे खासदार आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन कामे करावी लागणार आहेत.''
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com