अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारीपासून मुंबईत

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. तर, पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार आहे, अशी घोषणा विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Assembly Budget Session from 24th February in Mumbai
Assembly Budget Session from 24th February in Mumbai

नागपूर : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. तर, पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत होणार आहे, अशी घोषणा विधान परिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी, तर विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत एकूण सहा बैठका झाल्या. प्रत्यक्षात 34 तास 39 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी 5 तास 50 मिनिटे कामकाज झाले. विधान परिषदेत नियम 93 अन्वये 27 सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 15 निवेदने स्वीकृत झाली. सभागृहात सात सूचनांवर निवेदने झाली. तर, तीन निवेदने सभागृहात पटलावर ठेवण्यात आली, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिली.

विधान परिषदेत 59 औचित्याचे मुद्दे प्राप्त झाले. 45 मुद्दे मांडण्यात आले. 509 लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 139 सूचना मान्य झाल्या. 30 सूचनांवर चर्चा झाली. विशेष उल्लेखअंतर्गत 113 सूचना प्राप्त झाल्या, तर 78 सूचना मांडण्यात आल्या. अशासकीय विधेयकावर 2 सूचना प्राप्त झाल्या व त्या दोन्ही स्वीकृत करण्यात आल्या. नियम 289 अन्वये 13 प्रस्ताव प्राप्त झाल्या होत्या, अशी माहिती सभापती निंबाळकर यांनी विधान परिषदेत दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com