आजचा वाढदिवस : आमदार एकनाथ खडसे : भाजप नेते माजी महसूल मंत्री - Maharashtra BJP Eknath Khadse B'day | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : आमदार एकनाथ खडसे : भाजप नेते माजी महसूल मंत्री

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

आजचा वाढदिवस - एकनाथ गणपतराव खडसे (जन्म: 2 सप्टेंबर 1952) : भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्‍यातील कोथळी हे त्यांचे मूळ गाव. पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या गावात आदिशक्ती मुक्ताईचे मुख्य ठाणे आहे. सन 1987 मध्ये ते याच गावाचे सरपंच होते तेथून त्यांच्या राजकीय जीवन प्रवासास सुरूवात झाली.

एकनाथ गणपतराव खडसे (जन्म: 2 सप्टेंबर 1952) : भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान आमदार जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्‍यातील कोथळी हे त्यांचे मूळ गाव. पूर्णा नदीच्या काठावर असलेल्या गावात आदिशक्ती मुक्ताईचे मुख्य ठाणे आहे. सन 1987 मध्ये ते याच गावाचे सरपंच होते तेथून त्यांच्या राजकीय जीवन प्रवासास सुरूवात झाली. 1989 मध्ये त्यांनी मुक्ताईनगर (एदलाबाद) मतदार संघातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक लढविली त्यावेळी ते प्रचंड मताने विजयी झाले. त्यानंतर याच आजपर्यंत मतदार संघाचे ते प्रतिनिधीत्व करीत आहेत.

1995 ते 1999 दरम्यान युती शासनात ते अर्थमंत्री व पाटबंधारे मंत्री होते. पाटबंधारे मंत्री असतांना त्यांच्या काळात कृष्णा खोरे आणि तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती, त्या माध्यमातून सिचंनाच्या कामांना गती देण्यात आली होती. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असतांना 2009 ते 2014 मध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेता होते. सन 2014च्या निवडणूकीत राज्यात भाजप-सेनेचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात ते महसूल, कृषी, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक, मत्सपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री होते.

4 जून 2016ला त्यांना गैरव्यवहाराच्या आरोपावरून मंत्रीमंडळातून राजीनामा द्यावा लागला. खडसे यांच्या स्नुषा श्रीमती रक्षा खडसे रावेर मतदार संघाच्या खासदार आहेत. पत्नी सौ मंदाकिनी खडसे 'महानंद'च्या तसेच जळगाव जिल्हा दूध विकास संघाच्या अध्यक्षा आहेत. तर मुलगी अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या चेअरमन आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख