Maharashtra Band Sixteen Year old Rasika Shinde Speech pacified the mob | Sarkarnama

#MaharashtraBandh सोळा वर्षाच्या रसिका शिंदेंच्या भाषणाने हजारोंच्या जमावात शांतता

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सकल मराठा समाजातर्फे आज डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी दहाला आंदोलन सुरु झाले. संयोजकांसह विविध नेते व्यासपीठावर होते. तासाभरात तिथे एव्हढी गर्दी झाली की मोठे व्यासपीठ भरले. त्यातच एका युवकाच्या भाषणाने गोंधळ सुरु झाला. सर्वच उभे राहिले. संयोजक सर्वांना बसण्याचे आवाहन करु लागले. मात्र, गोंधळ वाढला. तशी पोलिस व संयोजकांची चिंताही वाढली.

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शहरात ठिय्या आंदोलन सुरु झाले. यावेळी व्यासपीठावर उत्साही युवकांची मोठी गर्दी झाली. अगदी रस्त्यावरही गर्दी झाल्याने पोलिसांनी रस्ता बंद केला. अनेक जण भाषणे करु लागल्याने गोंधळ झाला. गोंधळ वाढतच जाऊन नियंत्रणाबाहेर जाऊ लागला. अगदी संयोजकांपासून तर पोलिसही चिंतीत झाले. मात्र, मुंबईच्या मोर्चात व्यासपीठावर भाषण केलेल्या अकरावीची विद्यार्थीनी रसिका शिंदे हिने माईक हातात घेतला अन्‌ हजारो आंदोलक क्षणात शांत झाले. 

सकल मराठा समाजातर्फे आज डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी दहाला आंदोलन सुरु झाले. संयोजकांसह विविध नेते व्यासपीठावर होते. तासाभरात तिथे एव्हढी गर्दी झाली की मोठे व्यासपीठ भरले. समोरचा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला. यावेळी विविध नेते भाषणे करु लागले. यावेळी शेकडो उत्साही युवक व्यासपीठावर व दुतर्फा जमले. त्यातच एका युवकाच्या भाषणाने गोंधळ सुरु झाला. सर्वच उभे राहिले. संयोजक सर्वांना बसण्याचे आवाहन करु लागले. मात्र, गोंधळ वाढला. तशी पोलिस व संयोजकांची चिंताही वाढली.

मात्र, दहावीच्या परिक्षेत शंभर टक्के गुण मिळविलेल्या आणि मराठा क्रांती मोर्चात मुंबईला आझाद मैदानावर व्यासपीठावर भाषण केलेल्या रसिका शिंदेंने माईक हातात घेतला. ''सबंध महाराष्ट्राचे लक्ष नाशिकवर आहे. हे आंदोलन वाहिनीवर लाईव्ह होते आहे. शिवछत्रपतींच्या मावळ्यांना हे शोभेल काय?'', असे आवाहन केल्यावर जमाव आंदोलक शांत झाले. त्यानंतर तिने उस्फुर्त भाषण केले. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो आंदोलकांचा अनियंत्रित जमाव शांत झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. 

यावेळी व्यासपीठावर समन्वयक चंद्रकांत बनकर, माजी महापौर प्रकाश मते, ऍड श्रीधर माने, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, सुनिल बागुल, विजय करंजकर, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, हंसराज वडघुले, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, नगरसेविका हेमलता पाटील, करण गायकर, तुषार जगताप, नितीन डांगे पाटील, नगरसेवक विलास शिंदे, माजी आमदार नितीन भोसले, रंजन ठाकरे, नाना महाले, अर्जुन टिळे, अमोल पाटील, गणेश शेलार आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख