आता विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे; विजय वड्डेट्टीवार यांच्या पदावर संक्रांत

राज्याच्या विधानसभेतील काँग्रेसच्या आमदारात २०१९ च्या निवडणुकीत घट झाल्याने, आता काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे आता विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद असणार आहे. दरम्यान, सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेसचे विजय वड्डेट्टीवार यांच्या या पदावर संक्रांत येणार आहे.
Vidhan Bhavan Mumbai
Vidhan Bhavan Mumbai

पुणे  : राज्याच्या विधानसभेतील काँग्रेसच्या आमदारात २०१९ च्या निवडणुकीत घट झाल्याने, आता काँग्रेसला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे आता विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद असणार आहे. दरम्यान, सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले काँग्रेसचे विजय वड्डेट्टीवार यांच्या या पदावर संक्रांत येणार आहे.    

आमदारांच्या संख्याबळानुसार पद असे सूत्र महायुती आणि महाआघाडीत पाळले जात आहे. यानुसार सत्तेत असल्यास, ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री आणि विरोधात असल्यास, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता, असे हे सूत्र राज्याच्या राजकारणात मागील सुमारे तीन दशकांपासून पाळले जात आहे. याच सुत्रामुळे छगन  भुजबळ यांनी सन १९९२ मध्ये १२ आमदारांना सोबत घेत शिवसेना सोडल्याने, शिवसेनेला या पदावर पाणी सोडावे लागले होते. त्यावेळी हे पद भाजपकडे आले आणि दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते झाले होते.            

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४२ तर, राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे जास्त आमदार या सूत्रानुसार काँग्रेसचे तत्कालीन नेते राधाक्रष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते झाले होते, तर विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असल्याने, या पक्षाचे धनंजय मुंडे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही ४१ वरून ५४ तर, काँग्रेस आमदारांची संख्या ही ४२ वरून ४४ वर गेली आहे. यामुळे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार १० नी जास्त झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com