लैंगिक गुणोत्तरात महाराष्ट्र 22 व्या क्रमांकावर

लैंगिक गुणोत्तरात महाराष्ट्र 22 व्या क्रमांकावर

मुंबई: हरियानाच्या इतिहासात प्रथमच राज्यातील लैंगिक गुणोत्तर 950 पर्यंत गेले आहे. 'देशातील सर्वांत वाईट लैंगिक गुणोत्तर असलेले राज्य' असा हरियानाचा 'लौकिक' होता. या यादीत महाराष्ट्राचा क्रमांक 22 वा आहे.

राज्यातील लैंगिक गुणोत्तर वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या सामूहिक प्रयत्नांतून हे साध्य झाले आहे. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने देशात सुरू झालेल्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात आली. यातूनच राज्याचे लैंगिक गुणोत्तर सुधारण्याचे आव्हान सरकारने स्वीकारले.'' 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, हरियानातील लैंगिक गुणोत्तर (दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे असलेले प्रमाण) 879 इतके होते. त्या यादीत हरियाना 30 व्या स्थानी होते. या यादीत हरियानाखाली अंदमान-निकोबार, दिल्ली, चंडिगड, दादरा-नगर हवेली आणि दमण दिव हे केंद्रशासित प्रदेश होते.

यंदाच्या मार्चमध्ये प्रथमच हरियानातील लैंगिक गुणोत्तर 1000 पुरुषांमागे 950 स्त्रिया असे झाले. या ताज्या आकडेवारीनुसार, कैथल (864), रोहतक (863), झज्जर (893), गुरुग्राम (893), भिवानी (893), जिंड (896), फतेबाद (898), पंचकुला (912), रेवारी (913), अंबाला (921), मेवत (926), सोनपत (939) आणि फरिदाबाद (947) असे जिल्हानिहाय लैंगिक गुणोत्तर आहे.

मुलींना प्रोत्साहन देण्याच्या योजना हरियानात राबविण्यात आल्या. तसेच, भ्रूणहत्येसंदर्भातील आणि गर्भलिंग निदान चाचणीशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल 430 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, परराज्यांत जाऊन असे गुन्हे करणाऱ्या 80 जणांविरोधातही सरकारने कारवाई केली आहे.

2011 च्या जनगननेनुसार देशातील राज्यनिहाय लैंगिक गुणोत्तर
क्रमांक : राज्य : लैंगिक गुणोत्तर
1 : केरळ : 1084
2 : पुदुच्चेरी : 1037
3 : तमिळनाडू : 996
4 : आंध्र प्रदेश : 993
5 : छत्तीसगड : 991
6 : मेघालय : 989
7 : मणिपूर : 985
8 : ओडिशा : 979
9 : मिझोराम : 976
10 : गोवा : 973
11 : कर्नाटक : 973
12 : हिमाचल प्रदेश : 972
13 : उत्तराखंड : 963
14 : त्रिपुरा : 960
15 : आसाम : 958
16 : पश्‍चिम बंगाल : 950
17 : झारखंड : 948
18 : लक्षद्वीप : 946
19 : अरुणाचल प्रदेश : 938
20 : नागालॅंड : 931
21 : मध्य प्रदेश : 931
22 : महाराष्ट्र : 929
23 : राजस्थान : 928
24 : गुजरात : 919
25 : बिहार : 918
26 : उत्तर प्रदेश : 912
27 : पंजाब : 895
28 : सिक्कीम : 890
29 : जम्मू-काश्‍मीर : 889
30 : हरियाना : 879
31 : अंदमान-निकोबार : 876
32 : दिल्ली : 868
33 : चंडिगड : 818
34 : दादरा-नगर-हवेली : 774
35 : दमण-दिव : 618

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com