महाजनादेश यात्रा 29 ला कोल्हापुरात :  संजय भेगडे 

ही यात्रा 29 ऑगस्टला कोल्हापुरात येईल. यावेळी कोल्हापूर शहरात रोडशो करण्यात येणार आहे.- संजय भेगडे
cm_mahajanadesh_
cm_mahajanadesh_

कोल्हापूर : युती सरकारने गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात आश्वासक काम केले आहे. शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण देऊन सरकारने वचनपुर्ती केली. या सर्व उपलब्धीची माहीती देण्यासाठी महाजनादेश यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा 29 ऑगस्टला कोल्हापुरात येईल. यावेळी कोल्हापूर शहरात रोडशो करण्यात येणार आहे, अशी माहिती पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

यावेळी भेगडे म्हणाले, महाजन आदेश यात्रा ही संकल्पना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली. याअंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील 32 जिल्हे आणि सुमारे 150 विधानसभा मतदार संघ यांना भेटी देणार आहेत. या ठिकाणी जाऊन ते सरकारची पाच वर्षातील उपलब्ध लोकांपर्यंत पोहचवतील. 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीमध्ये महाजन आदेश यात्रा होणार आहे.

 दुसऱ्या टप्प्यात यात्रा पश्‍चिम महाराष्ट्रात येईल. सांगली मार्गे ऑगस्टला इचलकरंजी येथे महाजनादेश यात्रा पोहोचेल. तेथून रात्री साडेआठच्या सुमारास तावडे हॉटेल येथे महाजनादेश यात्रा येईल. तेथे कार्यकर्ते भव्य स्वागत करतील. तेथून ही यात्रा ताराराणी चौकात येईल तेथे रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील. दुसऱ्या दिवशी यात्रा राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करेल. 

दरम्यान यात्रेच्या तयारीसाठी बिंदू चौक कराव्यात आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यामध्ये भेगडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अधिकाधिक संख्येने यात्रेचे स्वागत करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, विजय जाधव, अशोक देसाई, आरडी पाटील, हेमंत आराध्ये, शिवाजी बुवा आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com