उमेदवारी कापण्याच्या चर्चेने भाजपचे नाशिकमधील आमदार गिरीश महाजनांच्या चरणी लीन ?

  उमेदवारी कापण्याच्या चर्चेने भाजपचे नाशिकमधील आमदार गिरीश महाजनांच्या चरणी लीन ?

नाशिक : लोकसभा निवडणुकीपासून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची बॉडी लॅग्वेज व पॉलीटीकल इमेज दोन्हींत पदोपदी आत्मविश्‍वास झळकत असतो. नाशिक शहरातील भाजप अंतर्गत वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी "काहींची उमेदवारी कापणारच' असे ठाम विधान केले. त्यामुळे शहरातील भाजपच्या चारही 
आमदारांच्या बॉडी लॅग्वेंजमध्ये अचानक बदल झाला. रविवारी झालेल्या कार्यक्रमात तर दोन आमदारांनी एका कार्यक्रमात महाजनांपुढे वाकून चरणस्पर्श केल्याने तो चर्चेचा विषय ठरला. आता कोणाची उमेदवारी कापणार यावरुन त्यांच्या उरात धडधड वाढल्याचे कळते. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयात पदाधिकारी, नेत्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी अनेकांचा झाडाझडती घेत पक्षातील बेशिस्त कठोरपणे हाताळणार असल्याचे जाहीर केले. उत्तम महाराष्ट्रातील विधानसभेच्या 47 जागा आपले लक्ष्य असल्याचे सांगत त्यांनी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केल्याचे सुचीत केले. नाशिक जिल्ह्यात सध्या पंधरा पैकी भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार असे आठ आमदार आहेत. यातील नऊ जागांवर परंपारगत जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना तर सहा जागांवर भाजप उमेदवारी करते. यातील मालेगाव शहर येथे भाजप निवडून येण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे येत्या निवडणूकीत कळवण व नांदगाव हे शिवसेनेकडे असलेले मतदारसंघ भाजपला मिळावेत असा त्यांचा प्रयत्न आहे. तेथे त्यांचे उमेदवारही तयार आहेत. 

शहरातील आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप (नाशिक पूर्व), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्‍चिम) हे सर्व तीन भाजपचे आमदार आहेत. श्री. महाजन यांनी उमेदवारी कापणारच असा निर्धार केल्याने या तिन्ही ठिकाणी विशेषतः पश्‍चिम आणि पूर्व मतदारसंघात भाजपचे अनेक इच्छुक तयार झाले आहेत. या इच्छुकांची सोशल मिडीयावर धूम सुरु आहे तर विद्यमान आमदार अस्वस्थ आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या उरात धकधक वाढली आहे. दिंडोरीचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांचा श्री. महाजन यांच्याशी विसंवाद झाल्याने नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप केल्यावरही त्यांची उमेदवारी रद्द झालीच. हे उदाहरण ताजे 
असल्याने आमदारांच्या उरातील धकधक वाढली. आमदार बाळासाहेब सानप यांचा वाढदिवस होता. त्या संदर्भातल्या एका कार्यक्रमात त्यांनी श्री. महाजन यांचे स्वागत करतांना चरणस्पर्श करीत महाजनांच्या चरणी लीन झाले. आमदार सीमा हिरे यांना कार्यक्षम आमदार पुरस्कार मिळाला. त्यांचा सत्कार महाजनांनी 
केला. तेव्हा त्यांनी देखील महाजनांना चरणस्पर्श केला. सामान्यतः भाजपमध्ये ही परंपरा नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला. आता श्री. महाजन " एक व्यक्ती, एक पद' या धोरणानुसार कोणाची विधानसभेची उमेदवारी कापतात या चिंतेने भाजप आमदार चिंताग्रस्त आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com