mahadik mahadik | Sarkarnama

गोकुळ : महादेवराव महाडिक यांची हुकूमशाही! 

सुनील पाटील 
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

आपल्याला संघाचा अहवाल मिळाला का? अहवालातील 1 ते 18 ठराव मंजूर काय? म्हणत अधिकार नसताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापुर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) सभा गुंडाळली. जे महाडिक संघाचे संचालक नाहीत त्यांना अहवाल वाचायचा अधिकार दिला कोणी अस संतप्त सवाल सभासदांनी केला. 

कोल्हापुर : आपल्याला संघाचा अहवाल मिळाला का? अहवालातील 1 ते 18 ठराव मंजूर काय? म्हणत अधिकार नसताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापुर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) सभा गुंडाळली. जे महाडिक संघाचे संचालक नाहीत त्यांना अहवाल वाचायचा अधिकार दिला कोणी अस संतप्त सवाल सभासदांनी केला. 

माजी आमदार पी. एन. पाटील यांनी संघाच्या 55 वर्षाचा गौरवशाली इतिहास सांगितला. पण हाच इतिहास मातीत घालण्याच काम महाडिक यांनी केल्याची टिका ही यावेळी झाली. सभासदानी 34 लेखी प्रश्न विचारले होते. या एकाही प्रश्नांची उत्तरे न देताच गोकुळची सभा गुंडाळली. वास्तवीक सहकार कायद्यानुसार अहवाल वाचन करण्याचा अधिकार सचिवांना असतो. त्यामुळे महाडिक यांना काय अधिकार असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे संघात आता हुकुमशाही सुरु झाली आहे. सभासदांच्या हक्क मारला जात आहे अशी टीका मारुती पाटील यांनी यावेळी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख