गोकूळसाठी या तालुक्यात महाडिकांची सतेज पाटलांवर मात

dhanjay mahadik, mahadeorao mahadik
dhanjay mahadik, mahadeorao mahadik

नागाव : कोल्हापूर जिल्हा दूध संघासाठी (गोकुळ) हातकणंगले तालुक्‍यातून 96 पैकी 74 ठराव महाडिक गटाकडे जमा झाले आहेत. त्यामुळे 80 टक्के दूध उत्पादक संस्था माजी आमदार महादेवराव महाडिक यांचेच नेतृत्व मान्य करत असल्याचे संकेत मिळत आहेत. आमदार प्रकाश आवाडे हे गोकूळच्या निवडणुकीसाठी महाडिक यांच्यासोबत राहणार असल्याने आणखी सहा ठराव महाडिक गटालाच मिळण्याची शक्‍यता आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनाही आठ ठराव मिळतील. मात्र कार्यक्षेत्रातील कॉंग्रेसचे आमदार राजू आवळे व शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना स्वतःसाठी एक ठराव मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.

गोकूळसाठी दूध उत्पादक संस्थेच्यावतीने मतदानाचा अधिकार कोणत्या व्यक्तीला दिला आहे. यासाठी सभासद संस्थांनी संबंधित व्यक्तीच्या नावे ठराव मंजूर करून त्याची मुख्य प्रत 22 जानेवारीपर्यंत जिल्हा विभागीय सहकारी उपनिंबधक (दुग्ध) कार्यालयात जमा करायची आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. एप्रिल 2020 ला गोकूळसाठी मतदान होणार आहे. हातकणंगले तालुक्‍यात गोकूळला सभासद असणाऱ्या संस्थांची संख्या 96 आहे. मात्र तालुक्‍यातून गोकूळचे प्रतिनिधित्व करणारा संचालक नाही. त्यामुळे या निवडणुकीत तालुक्‍याला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी मागणी होत आहे.

आठ ठराव हे महाडिक व मंत्री सतेज पाटील यासंभ्रमात थेट उप निबंधक कार्यालयात जमा झाले आहेत. लाटवडे, यळगूड, इचलकरंजी, हुपरी, घुणकी, भादोले व टोपमधील सुमारे आठ ठराव हे मंत्री पाटील यांचे नेतृत्व मानत असल्याने त्यांच्या गटाला मिळणार आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक व मंत्री सतेज पाटील यांच्यातील टोकाची ईर्षा पाहता गोकूळमध्ये दोन आघाड्या एकमेकांविरुध्द ताकदीने उतरणार यात शंका नाही. त्यामुळे ठराव गोळा करण्यापासूनच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाडीक गटातून कोण?
हातकणंगले तालुक्‍याला गोकूळचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यास महाडिक गटातून कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत स्पष्ट सांगता येणार नाही. पण गोकूळचे माजी संचालक व जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचे गट नते अरुण इंगवले, आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शौमिका महाडिक कि माजी आमदार अमल महाडिक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

राज्याचा पॅटर्न गोकूळमध्ये शक्‍य
मंत्री सतेज पाटील हे महाविकास आघाडीचा राज्याचा पॅटर्न गोकूळमध्ये राबवितील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे आमदार राजू आवळे, शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व गोकूळचे कर्मचारी विश्वास इंगवले हे आपल्या नावाचा ठराव मिळवत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com