mahadik and mushriff comes together | Sarkarnama

खासदार महाडीक-मुश्रीफ साथ साथ 

सरकारनामा न्यूजब्युरो
बुधवार, 8 मार्च 2017

गेल्या काही दिवसांपासून एकमेकांत मतभेद निर्माण झालेले राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक व आमदार हसन मुश्रीफ हे मुंबईतील विधानभवनाच्या
प्रांगणात एकत्र आले आणि त्यांना बघणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. या दोघांसोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही होते. श्री. तटकरे यांच्या साक्षीने महाडीक-मुश्रीफ
साथ साथ असल्याचे चित्र मुंबईत पहायला मिळाले. 

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून एकमेकांत मतभेद निर्माण झालेले राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक व आमदार हसन मुश्रीफ हे मुंबईतील विधानभवनाच्या
प्रांगणात एकत्र आले आणि त्यांना बघणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. या दोघांसोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही होते. श्री. तटकरे यांच्या साक्षीने महाडीक-मुश्रीफ
साथ साथ असल्याचे चित्र मुंबईत पहायला मिळाले. 

देशातील "टॉप वन' खासदार म्हणून श्री. महाडीक यांची निवड झाली. पीआरएस-इंडिया या संस्थेच्या सर्वेक्षणातून ही निवड झाल्याचे जाहीर झाल्यानंतर महाडीक
प्रदेशाध्यक्ष श्री. तटकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत गेले होते. सद्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातून श्री. तटकरे व श्री. मुश्रीफ बाहेर
पडत असतानाच त्यांची श्री. महाडीक यांच्याशी भेट झाली. प्रदेशाध्यक्षांसोबतचे या दोघांचे फोटो काढून घेण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. 
श्री. महाडीक यांनी यांनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना नमस्कार केला आणि आपोआप हसत खेळत गप्पांना सुरवात झाली. गप्पांच्या ओघात श्री. तटकरे यांनी गुगली
टाकलीच. तुमच्यात काही वाद असतील तर ते संपलेत, हे जाहीर करा, असं सांगत तटकरे यांनी एकत्रीत फोटोही काढला. आमदार मुश्रीफ यांनी खासदार महाडीक
यांच्याशी कसलाही वाद नसल्याचं सांगितलं. तर मुश्रीफ ज्येष्ठ आणि मार्गदर्शक नेते असल्याचं खासदार महाडीक म्हणाले. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रचारापासून श्री. महाडीक लांब होते. त्यांनी पक्षाच्या प्रचारात भाग घेतला असता तर आणखी काही जागा निवडून आल्या
असत्या, पण ते अलिप्त राहिले. त्यांच्या या भूमिकेवरून श्री. मुश्रीफ नाराज आहेत. गेल्याच आठवड्यात श्री. मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत श्री. महाडीक यांनी आता
पक्षात रहायचे का नाही हे जाहीर करावे अशी मागणी केली होती. त्याला निवेदनातून श्री. महाडीक यांनी प्रत्युत्तर देताना मी पक्षासोबतच असल्याचे जाहीर केले
होते. या पार्श्‍वभूमीवर या दोघांच्या झालेल्या भेटीची उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख