वाऱ्याची दिशा बारामतीऐवजी नागपूर!

आतापर्यंत किती मुख्यमंत्री झाले, मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ब्राह्मण समाजातील एका मुख्यमंत्र्याला जन्म घ्यावा लागला.
वाऱ्याची दिशा बारामतीऐवजी नागपूर!

मोडनिंब (सोलापूर) : आमचे सरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीर उभे आहे. माळी समाजाने शिक्षण घ्यावे, राजकारण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी अरण येथे केले. 

सावता परिषदेच्या राज्यस्तरीय माळी समाज मेळावा येथे झाला. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, शिवाजी कांबळे, बाळासाहेब माळी, रमेश वसेकर उपस्थित होते.

अरण तीर्थक्षेत्राला 'अ' वर्गाचा दर्जा देऊन अरणचा संपूर्ण विकास पूर्ण करू असे आश्वासन मंत्री जानकर यांनी दिले. माळी समाजाने शिक्षण घ्यावे. कोणताही व्यवसाय करताना लाजू नये. समाजाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहे, असे मत उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले. रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, कल्याणराव आखाडे, शंकर वाघमारे, नामदेव राऊत यांची यावेळी भाषणे झाली.  

शिवसेना-भाजप "रासप'बरोबर राहा. आता वाऱ्याची दिशा बदला. ती बारामतीऐवजी नागपूर करा, असा सल्ला यावेळी मंत्री जानकर यांनी उपस्थित राजकीय पदाधिकाऱ्यांना दिला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com