महादेव जानकरांची व्यथा...म्हणतात 'माझी स्थिती इकडे आड, तिकडे विहिर'

'रासप' आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. आमच्यात भांडण आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मात्र माझी स्थिती इकडे आड, तिकडे विहीर अशी आहे. त्यामुळे अन्य कुठलाच पर्याय नाही. त्यामुळे भाजप बरोबरच राहणार आहे,'' अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.
Mahadev Jankar
Mahadev Jankar

नाशिक : 'रासप' आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही. आमच्यात भांडण आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मात्र माझी स्थिती इकडे आड, तिकडे विहीर अशी आहे. त्यामुळे अन्य कुठलाच पर्याय नाही. त्यामुळे भाजप बरोबरच राहणार आहे,'' अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मंत्री जानकर नाशिकला आले होते. यावेळी भाजपच्या शहर कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी ते म्हणाले, ''शरद पवार हे देशाचे नेते आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत ते भाजप- शिवसेना महायुतीविषयी अनावश्‍यक आक्रमक झाले आहेत. अन्य विरोधी पक्ष देखील सध्या कमरेखालची भाषा करीत आहेत. सरकारच्या कामकाजाविषयी काही शका असल्यास जरुर विचारले पाहिजे. मात्र, कोणत्याही स्थितीत कमरेखालची भाष योग्य नाही. निवडणुका असल्या तरीही विरोधकांनी जबाबदारीनं बोलले पाहिजे. लोकशाही आहे म्हणून काहीही बोलावं हे अपेक्षीत नाही.''

ते पुढे म्हणाले, ''महायुतीतील बंडखोरांवर कारवाई केली जाणार आहे. यामध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची भूमिका महत्वाची असेल. 'रासप' आणि भाजप यातील भांडण हे घरातले आहे. माझा मुख्यमंत्र्यांवर विश्‍वास असल्याने ते लवकरच मिटेल. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधीही कोणालाही मोठं होऊ दिलं नाही. सगळं स्वतःच्या ताब्यात ठेवलं. महात्मा फुले यांना भारतरत्न सन्मान मिळावा, या मागणीवर मी ठाम आहे. याविषयी केंद्र सरकारला शिफारस केली आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com