पंढरपूर : मंत्री, नेते हे नेहमी व्यासपीठावर बसलेले आपण पाहातो. इतकेच नाही तर व्यासपीठावर बसण्यासाठी अनेक वेळा मानापमान नाटय ही रंगल्याचे अनेक वेळा पाहातो पण आज राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यासपीठावर न बसता कार्यकर्त्यामध्ये खाली बसणे पसंत केले.
मंत्री असलो तरी कार्यकर्त्याशी असलेली नाळ आज ही कायम असल्याचेच या कार्यक्रमातून त्यांनी दाखवून दिले आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे आज राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ता मेळावा पार पडला. नेहमी प्रमाणे येथील सभागृहात मंत्री महोदय महादेव जानकर यांच्यासाठी खास व्यासपीठ तयार करण्यात आले होते. मंत्री जानकर सभागृहात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली असता त्यांनी सोबतच्या कार्यकर्त्याना सन्मानाने व्यासपीठावर बसविले, स्वतः मात्र व्यासपीठासमोर साध्या फायबरच्या खुर्चीत बसून मेळाव्याला उपस्थिती लावली.
मंत्री आणि नेत्यांचा थाटमाट आपण नेहमीच पाहातो पण मंत्री महादेव जानकर यांनी आपल्या मंत्रीपदाची झुल बाजूला ठेवून कार्यकर्त्याना मोठेपणा देत स्वतः कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये बसणे पसंत केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.