दुष्काळ पाहणीसाठी जळगावात आलेले मंत्री जानकर दाढदुखीने त्रस्त 

जिल्ह्यात दुष्काळ पाहणीसाठी आलेले राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर दाढदुखीने त्रस्त झाले आहेत. जळगावात दुष्काळ पाहणी दौऱ्या अगोदर त्यांना दाढदुखीच्या उपचारासाठी भटकंती करावी लागली. सकाळीच दंततज्ञाकडे जावून उपचार करुन घेतल्यानंतर त्यांनी दुष्काळ आढावा बैठकीत सहभाग घेतला.
दुष्काळ पाहणीसाठी जळगावात आलेले मंत्री जानकर दाढदुखीने त्रस्त 

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळ पाहणीसाठी आलेले राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर दाढदुखीने त्रस्त झाले आहेत. जळगावात दुष्काळ पाहणी दौऱ्या अगोदर त्यांना दाढदुखीच्या उपचारासाठी भटकंती करावी लागली. सकाळीच दंततज्ञाकडे जावून उपचार करुन घेतल्यानंतर त्यांनी दुष्काळ आढावा बैठकीत सहभाग घेतला. 

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर जिल्हयातील दुष्काळ पाहणी करण्यासाठी पहाटे जळगावात दाखल झाले. पुणे-नागपूर एक्‍सप्रेसने ते जळगावात दाखल झाले. अजिंठा विश्रामगृहावर त्यांनी विश्राम केला. त्यानंतर अचनाक त्यांची दाढ दुखू लागली. जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या समवेत ते जळगावातील प्रसिध्द दंत्तचिकित्सक डॉ.सुरेश पाटील यांच्या रिंगरोडवर असलेल्या दवाखान्यात गेले. या ठिकाणी डॉक्‍टरांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी 'एक्‍स-रे'ही काढला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी आढावा बैठकिसाठी त्यांनी उपस्थिती देवून तालुक्‍यात दुष्काळाच्या पाहणीसाठी रवाना झाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com