महादेव जानकरांचे रासपच्या कार्यकर्त्याना भर सभेत खडेबोल

विधानसभेसाठी पंढरपूर मंंगळवेढयाची जागा मागणार्या येथील रासपच्याच कार्यकर्त्यांना रासपचे राष्ट्रायीय अध्यक्ष तथा पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भर सभेतच खडे बोल सुनावले.
Mahadeo Jankar
Mahadeo Jankar

पंढरपूर : विधानसभेसाठी पंढरपूर मंंगळवेढयाची जागा मागणार्या येथील रासपच्याच कार्यकर्त्यांना रासपचे राष्ट्रायीय अध्यक्ष तथा पशु संवर्धन मंत्री  महादेव जानकर यांनी भर सभेतच खडे बोल सुनावले. ''आधी गावागावात बुथ बांधणी करा कार्यकर्त्यांची फळी तयार करा आणि मग विधानसभेची मागणी करा, जागा मागायची अन पडायची असं यापुढे होणार नाही कमी जागा मागू पण त्या जिंकणाऱ्या लढवू," असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले 

मंगळवेढा येथे रासपच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित केला होता.यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत रासप मोठ्या तकतीने लढणार असे सांगितले. "जो पर्यंत मत विकणारे लोक मी होणार नाहीत तो पर्यंत मत विकत घेणारे नेते तयार होणार नाहीत. चार राज्यात रासपला मान्यता मिळाली आहे  राज्यात 1.2 टक्के मतदान झाले आहे  राज्यात रासपचे 98 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. महाराष्ट्र सोडून देशात भाजप बरोबर कुठे ही युती नाही. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीत रासप स्वतंत्रपणे लढणार असून 12 आमदार निवडून येतील, असा" विश्वास ही जानकर यांनी व्यक्त केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com