महाराष्ट्र शासन कोळी बांधवाच्या पाठीशी खंबीर : महादेव जानकर  - mahadeo jankar in dehli | Politics Marathi News - Sarkarnama

महाराष्ट्र शासन कोळी बांधवाच्या पाठीशी खंबीर : महादेव जानकर 

सरकारनामा ब्युराे
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासन कोळी बांधवाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले. 

येथील एनडीएमसी सभागृहात "वर्ल्ड फोरम ऑफ फिशरीज पिपल्स' या संस्थेच्यावतीने 7 व्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री जानकर बोलत होते. या सर्वसाधारण सभेचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि केंद्रिय कृषी मंत्री राधा मोहन सिंह यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्राच्या वतीने श्री जानकर उपस्थित होते. त्यांच्यासह विविध राज्यांचे मत्स्य विकास मंत्रीही उपस्थित होते. 

जानकर म्हणाले, कोळी बांधवाची प्रगती व्हावी यासाठी राज्यशासन प्रयत्नरत आहे. कोळी बांधवाना घरे बांधणीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. कोळी समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या समाजाची आर्थिकस्थिती बळकट व्हावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. आधुनिक मत्स्य शेतीचे ज्ञान महाराष्ट्रातील कोळी समाजाने अर्जित करावे, यासाठी राज्य शासन पूर्ण मदत करेल, असे श्री जानकर म्हणाले. 

मत्स्यविकास मंत्रालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत येवढा लाभ या मंत्रालयाला झालेला नव्हता मात्र, आज या मंत्रालयाने कात टाकलेली आहे आणि मत्स्य महामंडळाला 81 हजार कोटींचा फायदा झालेला आहे. कोळी समाजाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. समुद्री किनारी असणा-या जिल्ह्यांमध्ये कोळी समाजाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी पोर्टचे उद्घाटन करण्यात आलेले असून या पोर्टमध्ये कोळी महिलांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. देशातील विविध कोळी संघटनांना सोबत घेऊन यासंदर्भात काम सुरू आहे. 

मत्स्य व्यवसायामध्ये कोळी समाजातील महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात असतो. या माहिलांना आरोग्य व स्वच्छते च्या सोयी उपलब्ध करून देणा-या नार्वे देशाच्या धर्तीवरील हब राज्यातील ससूण डॉक येथे उभारण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू आहे. राज्यात जवळपास 197 मासे विक्री केंद्र असून या ठिकाणांचा विकास करण्यात येईल, यासंदर्भात विविध विकासकांशी चर्चा करण्यात येत आहे, असेही जानकर म्हणाले. 

'सरकारनामा' मोबाईल अॅप
अँड्रॉईड अॅप डाऊनलोड करा
iPhone वर 'सरकारनामा' वाचा

अँड्रॉईड अॅपची लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama&hl=en

iOS अॅपची लिंक:
https://itunes.apple.com/gb/app/sarkarnama/id1282880016?mt=8 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख