अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका मिळाली असती तर गेलो असतो..: महादेव जानकर

अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका मिळाली असती तर गेलो असतो..: महादेव जानकर

नाशिक : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरेंच्या लग्नाला अनेक मंत्र्यांनी उपस्थिती लावली असतांना पशुसंवर्धन राज्यमंत्री महादेव जानकर यांनी नाशिकमध्ये मात्र व्यक्त केली नाराजी.  अमित ठाकरेंच्या लग्नाबद्दल मला माहितीच नाही. मला पत्रिकाच मिळाली नाही. पत्रिका मिळाली की शुभेच्छा द्यायला मी जाईल, असे त्यांनी सांगितले.

ते नाशिक येथे कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा ते बोलत होते. या विवाहसोहळ्याला राजकारण, उद्योग आणि चित्रपट, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्याबद्दल जानकर यांना विचारले असता त्यांनी थेटपणे मत सांगितले.

लग्नसोहळ्याला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय, जयदेव ठाकरे आणि कुटुंबीय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कुटुंबीय, उद्योगपती रतन टाटा, अजित पवार, पंकजा मुंडे, रश्मी ठाकरे, उज्ज्वला शिंदे, प्रणिती शिंदे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, आशिष शेलार, रितेश देशमुख, अमित देशमुख, सचिन तेंडूलकर, पद्मजा फेणाणी, आशा भोसले, बाबासाहेब पुरंदरे, शायना एनसी, आमिर खान, उत्तरा केळकर आदी या वेळी उपस्थित होते. 

अमित आणि मिताली यांचा शुभ विवाह लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये झाला. लग्नाचा मुहूर्त  दुपारी १२ वाजून ५१ मिनीटांचा होता. हळदीचा कार्यक्रम काल संध्याकाळी आप्तेष्टांच्या उपस्थितीत पडला. राज ठाकरे यांचे 'कृष्णकुंज' हे निवासस्थान आणि परिसर दिव्यांच्या  रोषणाईने उजळून निघाला आहे.

अमित आणि मिताली यांच्या  मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.  अमित आणि  मिताली बोरुडे यांचा साखरपुडा  डिसेंबर २०१७ मध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला होता. मिताली बोरुडे प्रख्यात सर्जन डॉ. संजय बोरूडे यांच्या  कन्या असून त्या नावाजलेल्या  फॅशन डिझायनर आहेत. अमित ठाकरेंची बहीण उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com