महाबळेश्‍वर नगराध्यक्षांसह 4 नगरसेवक भाजपत !  - mahabaleshwar muncipal president | Politics Marathi News - Sarkarnama

महाबळेश्‍वर नगराध्यक्षांसह 4 नगरसेवक भाजपत ! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह 4 नगरसेवकांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

कऱ्हाड (जि. सातारा) : महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांच्यासह 4 नगरसेवकांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 

स्वप्नाली शिंदे यांच्यासह कुमार शिंदे, श्रद्धा रोकडे, सुनीता आखाडे हे नगरसेवक मलकापुरातील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवासी झाले. या प्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाबळेश्‍वर आमच्यासाठी भूषण आहे. देशातील सर्वात चांगले पर्यटन स्थळ बनविण्याचे नियोजन आहे. स्वच्छ, सुंदर महाबळेश्वर करण्याचा आमचा अजेंडा राहील. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख