राज्यात महाशिवआघाडीच्या नेत्यांचे सूर जुळले ,मसुदाही फायनल झाला 

..
mahashiv Aghadi
mahashiv Aghadi

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या समन्वय समितीची संयुक्त बैठक आज पार पडली.  या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे .

 तिन्ही पक्षप्रमुखांना तो तातडीने पाठवण्यात येईल त्यांच्या मान्यता घेवून पुढील चर्चा सुरू होतील अशी माहिती काॅग्रेसचे विजय वडेट्टीवर, शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे जयंत पाटील , छगन भूजबळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. 

सत्तास्थापनेसाठी आज या तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. यामधे किमान समान कार्यक्रमावर सखोल चर्चा झाली.

यानंतर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी तीन पक्ष एकत्र येतात तेंव्हा काही बाबीवर सहमती करताना वेळ लागतो. तरीही आज या तिन्ही पक्षाचा सत्तेतला किमान समान कार्यक्रमाचा मसुदा अंतिम झाला आहे. लवकरच काॅग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे हा मसुदा पाठवून त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. 


बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांमध्ये झालेल्या घडामोडी पाहता शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र अखंडपणे सुरु आहे असे दिसतेय .  

राजकीय हालचाली अत्यंत  वेगाने घडताना दिसत आहेत .  त्यापेक्षाही या  तिन्ही पक्षांच्याराज्यातील  नेत्यांचे  सूर आता परस्परांशी चांगले  जुळले  असल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभर झालेल्या हालचालीतून महाशिवआघाडी आकाराला येत असल्याचे दिसले  . 

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी या दोन नेत्यांची भेट त्याच्या 17 तारखेला होणार असल्याचे वृत्त असून या भेटीमध्ये या मसुद्याला अंतिम मंजुरी मंजुरी मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

  काँग्रेस पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्रिपदासाठी मुख्यमंत्री पदावर  दावा  करणार नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com