पुण्याची बालचित्रवाणी आजपासून बंद, ई- बालभारतीस शासन मान्यता

पुण्याची बालचित्रवाणी आजपासून बंद, ई- बालभारतीस शासन मान्यता

सोलापूर - विधी व न्याय विभाग व वित्त विभागाच्या सूचनेनुसार तसेच नियामक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बालचित्रवाणी बंद करण्याचा निर्णय झाला होता. शासनाच्या या निर्णयास मान्यता देण्यात आली असून ई- बालभारती ही संस्था नव्याने स्थापन करण्यात येणार आहे. बालचित्रवाणी ही संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत होती. संस्थेतील कर्मचाऱ्यांचे वेतन व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सुद्धा रक्कम शिल्लक नसायची. या संस्थेत 50 पेक्षा कमी कामगार असल्याने आणि ही संस्था उद्योग या संज्ञेत येत असल्याने ती बंद करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय खालील लिंकवर उपलब्ध आहे -

संस्थेतील कार्यरत कर्मचाऱ्यांना औद्योगिक कलह कायदा, 1947 नुसार एक महिन्याचा आगावू 'नोटीस पे' देण्यात येणार आहे. तसेच आज 31 मे 2017 पासून या कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांत बालचित्रवाणीची आर्थिक परिस्थिती खराब झाली होती. निधी अभावी कर्मचाऱ्यांचे-यांचे महिनोमहिने वेतन न होणे, नवीन यंत्रणांचा अभाव, नवीन कार्यक्रमांची ठप्प झालेली निर्मिती यांमुळे बालचित्रवाणी बंद होणार अशी चर्चा होती. शिक्षण विभागाची ही महत्त्वाची संस्थाअसल्याने शासन बालचित्रवाणी बंद होऊ देणार नाही अशी अपेक्षा बऱ्याच जणांना होती. शासनाच्या या निर्णयाने आता याला पूर्ण विराम मिळाला आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये बालचित्रवाणीची स्थापना केली. मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हा या संस्थेचा महत्त्वाचा उद्देश होता. विविध शाळांमध्ये बालचित्रवाणीचे कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यात येत होते. विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढवणाऱ्या अनेक कार्यक्रमाची निर्मिती बालचित्रवाणीकडून केली
जात होती. सुरवातीला केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून संस्थेला निधीमिळत होता. स्थापनेनंतर काही वर्षांनी राज्य शासनाने संस्थेची पूर्ण जबाबदारी घ्यायची, असा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्य शासनाने ही जबाबदारी घेतली होती. मात्र, फेब्रुवारी 2914 पासून या कार्यक्रमांचे प्रक्षेपण बंद करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com